पराभव माझा, पण नाचक्की भाजप अन् चव्हाणांची, प्रतापराव चिखलीकरांची नाराजी जाहीर…

पराभव माझा, पण नाचक्की भाजप अन् चव्हाणांची, प्रतापराव चिखलीकरांची नाराजी जाहीर…

Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan : नांदेड लोकसभा मतदारसंघातून भाजपचे प्रताप पाटील चिखलीक (Pratap Patil Chikhlikar) यांचा काँग्रेसच्या वसंत चव्हाण यांनी मोठ्या मताधिक्याने पराभव केला होता. या पराभवाचे खापर आता प्रताप पाटील चिखलीकर यांनी भाजप आणि माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभा खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्यावर फोडले. पराभव माझा झाला, पण नाचक्की भाजप आणि चव्हाणांची झाली, अशी टीका चिखलीकर यांनी केली.

शिखर बॅंक : क्लोजर रिपोर्टवर आक्षेप घेतला? अण्णा हजारे म्हणतात, ‘मला कल्पनाच नाही…’ 

लोकसभा निवडणुकीपूर्वी अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. यानंतर भाजपने चव्हाण यांना राज्यसभेवर पाठवलं. त्यामुळे नांदेड लोकसभेची जागा भाजप प्रचंड बहुमताने जिंकणार असल्याची चर्चा होती. मात्र, चिखलीकर यांचा पराभव झाला. या पराभवावरून जिल्ह्यात आता भाजपमधील अंतर्गत वातावरण चांगलेच तापले आहे. चिखलीकर यांची नाराजी आता जिल्ह्याच्या आढावा बैठकांमधून समोर येत आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी एक-दोघांनी माझे काम केले नाही, मी त्यांना शेवटपर्यंत सोडणार नाही, असं म्हटलं होतं.

Raveena Tandon चा ‘तो’ व्हिडिओ बनविणे महागात पडणार; तब्बल शंभर कोटी द्यावे लागणार? 

तर आज चिखलीकर म्हणाले, नांदेड लोकसभा मतदारसंघात माझा पराभव झाला असला तरी जिल्ह्यात भाजप आणि माजी मुख्यमंत्री, खासदार अशोक चव्हाण यांची नाचक्की झाली. माझ्या पराभवामुळे केंद्रात अशोक चव्हाण यांना मंत्रिपद मिळाले नाही, असंही चिखलीकर म्हणाले.

…म्हणून चव्हाणांचे मंत्रिपद हुकले
ते म्हणाले, अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजप आणि महायुतीचे कार्यकर्ते नांदेड लोकसभा मतदारसंघात सहज विजय मिळवतील या भ्रमात राहिले. कार्यकर्त्यांनी थोडे कष्ट केले असते तर मी जिंकलो असतो आणि अशोक चव्हाण यांना केंद्रात मंत्रीपद मिळाले असते. पण, मी हरलो आणि चव्हाण यांचे मंत्रिपद हुकले, असे चिखलीकर यांनी जाहीरपणे सांगितलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube