नांदेडात शरद पवारांना धक्का! आमदाराच्या उपस्थितीत ‘या’ दोन बड्या नेत्यांच्या हाती घड्याळ..

नांदेडात शरद पवारांना धक्का! आमदाराच्या उपस्थितीत ‘या’ दोन बड्या नेत्यांच्या हाती घड्याळ..

Nanded News : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांचे पडघम वाजू (Maharashtra Local Body Elections) लागले आहेत. या निवडणुकांची (Nanded News) घोषणा अद्याप झालेली नाही मात्र निवडणुका लवकरच होतील असे सांगितले जात आहे. या निवडणुकांची तयारी राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. पक्षांतराला वेग आला आहे. महायुतीत इनकमिंग वाढलं आहे. यातच शरद पवार गटाला (Sharad Pawar) धक्का देणारी बातमी आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष अंकुश देसाई आणि महिला तालुकाध्यक्ष तारकेश्वरी पाटील यांनी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. नांदेडमधील या राजकीय घडामोडीने शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. याआधीच राजकीय पक्षांत फोडोफोडीचं राजकारण सुरू झालं आहे. स्थानिक पातळीवरील नेते पक्षांतर करताना दिसत आहेत. यात महायुतीतील तिन्ही पक्षांत इनकमिंग वाढलं आहे. शिंदे गट, अजित पवार गट (Ajit Pawar NCP) आणि भाजपात रोजच अनेक नेते प्रवेश करत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी (MVA) अस्वस्थता वाढली आहे.

आम्हालाही वाटतं अजितदादांनी मुख्यमंत्री व्हावं, मिटकरींच्या वक्तव्यानंतर NCP च्या बड्या नेत्याचं विधान

काही दिवसांपूर्वीच शिवसेना ठाकरे गटाला नाशिकमध्ये मोठा धक्का बसला होता. नाशिकमधील दिग्गज नेते सुधाकर बडगुजर आणि माजी मंत्री बबनराव घोलप यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. या पक्षप्रवेशाआधीच बडगुजर यांची ठाकरेंनी पक्षातून हकालपट्टी केली होती. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. मात्र यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला. नाशिक महापालिका निवडणुकीआधी ही घडामोड ठाकरे गटाला धक्का देणारी ठरली.

कोकणात महायुतीत ट्विस्ट

विधानसभा निवडणुकीत भाजपात बंडखोरी करणारे माजी जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भोईर (Dilip Bhoir) यांनी आज शिवसेनेचा धनु्ष्यबाण हाती घेतला.विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या जागावाटपात येथील जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली होती. त्यामुळे भोईर निराश झाले होते. त्यांनी थेट बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली होती. मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. भोईर यांना 33 हजार मतं पडली होती. या मतदारसंघात शिंदे गटाचे महेंद्र दळवी विजयी झाले. दिलीप भोईर अलीबागमधील भाजप नेते होते. परंतु, त्यांनी निवडणूक काळात बंडखोरी केली होती.

महायुतीत ट्विस्ट! भाजपाच्या माजी जिल्हा उपाध्यक्षांच्या हाती धनुष्यबाण; विधानसभेत केली होती बंडखोरी

या घडामोडीनंतर भाजपने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. तेव्हापासून भोईर राजकीय वनवासात होते. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्याने राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. पक्षांतराला वेग आला आहे. यातच भोईर यांनी शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या प्रवेशामुळे या भागात शिंदेसेनेची राजकीय ताकद वाढणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube