ताथवडेमध्ये भाजप पॅनलचा जोरदार प्रचार; पवार, नवले आणि स्थानिकांचे बळ भाजपसोबत

PCMC Election 2026: वाहतूक कोंडी व इतर समस्यांना कायमचे सोडविण्यासाठी मुख्य रस्ते, उपरस्ते, एलिव्हेटेड कॉरीडोअर यांसारख्या उपाययोजनांवर भर.

  • Written By: Published:
PCMC Election 2026 Strong campaign by BJP panel in Tathawade

PCMC Election 2026: पिंपरी चिंचवड महापालिका (PCMC Election 2026) निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 25 मधील भाजप (BJP) पॅनलच्या प्रचार टप्प्यात ताथवडे गावठाणातील नृसिंह मंदिरात नारळ फोडून पदयात्रा काढण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या नेतृत्वाखाली विकासाची सातत्यपूर्ण परंपरा आणि भविष्यासाठी ठोस व्हिजन घेऊन प्रभागात तसेच ताथवडे गावातील विकासकामांना गती देण्याचा निर्धार ग्रामस्थांच्या समोर उमेदवारांनी केला.

ही पदयात्रा नृसिंह मंदिर, ताथवडे गावठाण येथून सुरू होऊन रघुनंदन कार्यालय, खांबेटे वस्ती, लोंढे वस्ती या मार्गे संपन्न झाली. यावेळी प्रभाग क्रमांक 25 मधील भाजपचे अधिकृत उमेदवार राहुल तानाजी कलाटे (Rahul Kalate), श्रुती राम वाकडकर (Shruti Ram Wakadkar), रेश्मा चेतन भुजबळ आणि कुणाल वाव्हळकर यांच्यासह राम वाकडकर, चेतन भुजबळ, संतोष पवार, बाळासाहेब सपकाळ, सुरेश पवार, अशोक पवार, सीताराम पवार, पाटीलबुवा पवार, अनिकेत नवले, भारती विनोदे, जयदीप पवार, नागेश पवार, लक्ष्मणराव मोहिते, मयूर पवार, संजय पवार, संतोष कदम, वसंतराव नवले, चंद्रकांत वाडकर, गणेश सपकाळ, जीवन नवले, निखिल नवले, जालिंदर फेंगसे, बाळासाहेब शिंदे (गुरव), पांडुरंग शिंदे, विजय वाघुळे, संदीप पारखी गिरीश दर्शले, देविदास पवार, राजेंद्र पवार, मारुती पवार, सोनवणे, जाधव, निकाळजे यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


मुख्य रस्ते, उपरस्ते, एलिव्हेटेड कॉरीडओर उभाययोजनांवर भर- श्रुती राम वाकडकर

ताथवडे, वाकड आणि पुनावळे या गावांचा सर्वांगीण विकास करण्याचा आमचा मुख्य उद्देश आहे. येथील वाहतूक कोंडी व इतर समस्यांना कायमचे सोडविण्यासाठी मुख्य रस्ते, उपरस्ते, एलिव्हेटेड कॉरीडोअर यांसारख्या उपाययोजनांवर भर दिला जाईल. भाजपला प्रचारात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. ताथवडेच्या सुनियोजित विकासाला गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मार्गदर्शन येत्या काळात लाभणार असल्याचे भाजपच्या उमेदवार श्रुती राम वाकडकर यांनी म्हटलंय.


ताथवड्यात पवारांचा भाजप प्रवेश

ताथवडे गावातील प्रतिष्ठित आणि शिवसेना चिंचवड विधानसभा उपाध्यक्ष संतोष पवार यांनी कॅबिनेट मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासह शरद पवार, नागेश पवार, जयदीप पवार यांनीही भाजपमध्ये प्रवेश करत प्रभाग २५ मधील भाजपच्या पॅनलचा प्रचार सुरु केला. संतोष पवार यांनी 2017 च्या मनपा निवडणुकीत ताथवडे गावातून दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती. त्यामुळे भाजपला स्थानिक पातळीवर पवारांची साथ मिळाल्याचे चित्र बघायला मिळते आहे.

follow us