पाच वर्ष किती फेसबुक पोस्ट टाकल्या ? कुठे जाणार होते ? जर सत्य बाहेर…; फडणवीसांचा कोल्हेंना इशारा

पाच वर्ष किती फेसबुक पोस्ट टाकल्या ? कुठे जाणार होते ? जर सत्य बाहेर…; फडणवीसांचा कोल्हेंना इशारा

Devendra Fadnavis criticized Amol Kolhe: महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) यांच्या प्रचारार्थ शिरुर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची सभा झाली. या सभेत फडणवीस यांनी अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्यावर जोरदार फटकेबाजी केली. पाच वर्ष किती फेसबुक पोस्ट टाकल्या ? कुठे जाणार होते ? जर सत्य बाहेर आले तर खरा चेहरा आपल्यासमोर उघड होईल, असा इशारा फडणवीस यांनी कोल्हे यांना दिला आहे.


दिंडोरीत पवारांचा डाव… जीवा पांडू गावितांची माघार : भास्कर भगरेसांठी केली लाखभर मतांची सोय

फडणवीस म्हणाले, आढळराव यांनी पक्ष बदलला नाही. मागच्या वेळी आम्ही पालघरमध्ये उद्धव ठाकरे यांनी सांगितले जागा आणि उमेदवार द्या, आम्ही आमचा खासदार उद्धव ठाकरे यांना दिला आणि पुन्हा निवडूनही आणले आहे. त्यामुळे एका विचारात काम करीत असताना या ठिकाणी पक्ष बदलला असे काही नाही, आम्ही ठरवून हे केले आहे. समोरच्या उमेदवार पक्ष बदलला असे म्हणतं असेल तर त्यांनी किती वेळा निष्ठा बदलली ? गेल्या पाच वर्षात किती फेसबूक पोस्ट टाकल्या. किती वेळा कुठे-कुठे जाणार होते. ते कसे कसे थांबले हे सांगितले तर त्यांचा खरा चेहरा आपल्या समोर उघड होईल, असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातले दोन पक्ष लोप पावतील…; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा


नाटक प्लॉप निघालं तर पुन्हा कुणीच नाटक पाहायला जात नाही

आढळरावांपेक्षा एका गोष्टीत अमोल कोल्हे हे सरस आहेत. आढळराव यांना नाटककार नाहीत. आढळराव तुम्हाला नाटक जमत नाही. ते एवढे नाटकी आहेत. त्यांना रडता येतं, हसता येतं. बोलता येतं. जुमलेबाजी करता येते. पण एक लक्षात ठेवा हे मी त्यांना सुद्धा सांगतो. लोकं एकदाच नाटकाचं तिकीट घेऊन नाटक पहायला जातात. नाटक जर फ्लॉप निघालं तर पुन्हा कुणीच नाटक पहायला जात नाही. शिरुरच्या जनतेनं एकदा तिकीट घेतलं आहे.

शिरुरची लोकच जबरदस्त, फडणवीसांचं सर्टिफिकेट

शिरुरची लोकं खरंच हुशार आहेत. मी पाहिलं पाच वर्ष हा गडी फिरकला नाही. आता ते गावोगावी जातात. लोकंही बोलावतात स्वागत करतात, हार घालतात. समोरच्यालाही वाटतं वा.. काय स्वागत केलं अन् नंतर लोकं हळूच विचारतात पाच वर्षे कुठे होता सांगा ? खरंच जबरदस्त लोकं आहेत तु्म्ही असे फडणवीसांनी म्हणताच सभेतील लोकांनीही त्यांना हसून दाद दिली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube