आढळराव तीन लाख मतांनी विजयी होणार, आमदार मोहितेंनी घेतली विजयाची गॅरंटी

आढळराव तीन लाख मतांनी विजयी होणार, आमदार मोहितेंनी घेतली विजयाची गॅरंटी

Dilip Mohite Patil on Shivajirao Adhalrao Patil : २०१९ च्या लोकसभा निवडणुक (Lok Sabha Elections) शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर लढवणारे शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यंदा राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढत आहे. त्यांच्यासमोर अमोल कोल्हेंचं तगडं आव्हान आहे. दरम्यान, आता खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटलांनी (Dilip Mohite Patil) आढळराव पाटील विजयी तीन लाख मतांनी विजयी होतील, असा विश्वास व्यक्त केला.

चावी अजिदादांकडे पण खजिना माझ्या सहीशिवाय उघडतच नाही; फडणवीसांचं धाराशिवकरांना आश्वासन 

आज दिलीप मोहिते पाटलांनी लेट्सअप मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. ते म्हणाले, आमचा प्रचार घराघरापर्यंत आहेत. ३६५ दिवस आमचा जनतेशी संबध असतो. त्यामुळं निवडणुकीच्या तोंडावर जनतेपर्यंत जावं, हे आम्हाला आम्हाला करावं लागत नाही. २०१४ च्या निवडणुकीत आम्ही आढळरावांना एक ते दीड लाख मताधिक्य दिलं. तर मागच्या वेळी मताधिक्य तोडून कोल्हेंना साडेसात- आठ मताधिक्य देऊन विजयी केलं. आता महायुतीचे घटक म्हणून शिवसेना-राष्ट्रवादी-भाजप एकत्रित आहे.  त्यामुळं खेडमधून लाखांच्या आसपास आढळरांवांना मताधिक्य मिळेल. तर मतदारसंघातील सर्वच ठिकाणचा विचार केला तर आढळराव तीन लाख मतांनी विजयी होती, असं मोहिते पाटील म्हणाले.

चावी अजिदादांकडे पण खजिना माझ्या सहीशिवाय उघडतच नाही; फडणवीसांचं धाराशिवकरांना आश्वासन 

आमच्यात वैयक्तिक वाद नव्हता…
आढळराव आणि तुमच्यात काय वाद होता? याविषयी विचारले असता मोहिते म्हणाले, मी माझ्या पक्षाचं काम करायतो, ते त्यांच्या पक्षाचं काम करायचे. दोघांचे पक्ष वेगवेळळे असल्यानं वाद होते. पण ते वैयक्तिक कधीच नव्हते. आमच्यात वैचारिक मतभेत होते. आता ते राष्ट्रवादीत आले आहेत. त्यामुळं आता आमच्यातला वाद मिटल्याचं मोहिते म्हमाले.

मोहिते पाटलांची अमोल कोल्हेंवर टीका
ते म्हणाले, निवडणुकीआधी कोल्हेंची आणि माझी ओळखही नव्हती. पक्षाने त्यांना उमेदवारी द्यायचं ठरवलं. त्यानंतर आम्ही त्यांचा प्रचार केला. कोल्हेंनी कधीही एखाद्या कार्यकर्त्याला एक रुपयाही दिली नाही. आम्ही आमच्या पैशानं त्यांचा प्रचार केला. कित्येक गावात ते प्रचारासाठी जाऊ शकले नव्हते. लोकांनी फक्त आमच्यावर विश्वास टाकून त्यांना विजयी केलं. ज्या दिलीप मोहिते पाटलांनी निवडून आणलं त्यांना कधी घोटभर चहाही कोल्हेंनी पाजला नाही. निवडणून आल्यावरही ते कधी लोकांत गेले नाहीत, अशी टीका मोहिते पाटलांनी केली.

विकास केला असं ते सांगतात. त्यांनी काय विकास केला हे सागांवं. कोल्हे खोटं बोलतात आणि रेटून बोलातत. मुळात ते नट असल्यानं नाटक कसं रंगवायचं, हे त्यांच्याकडून शिकावं, असा खोचक टोला मोहिते पाटलांनी लगावला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube