चावी अजिदादांकडे पण खजिना माझ्या सहीशिवाय उघडतच नाही; फडणवीसांचं धाराशिवकरांना आश्वासन

चावी अजिदादांकडे पण खजिना माझ्या सहीशिवाय उघडतच नाही; फडणवीसांचं धाराशिवकरांना आश्वासन

Devendra Fadanvis Promised to Dharashiv Voters : महाराष्ट्राच्या खजिन्याची चावी जरी अजित दादांच्या ( Ajit Pawar ) हातात असली तरी ते म्हणतात की देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis ) यांनी सही केल्याशिवाय तो खजिना उघडणार नाही. असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बार्शीमध्ये धाराशिवच्या मतदारांना ( Dharashiv Voters ) विकासकामांचं आश्वासन दिलं.

अकलूज बोले अन् सोलापूर जिल्हा हाले ही स्थिती नाही; तानाजी सावंतांचा मोहिते पाटलांवर हल्लाबोल

देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. यातच धाराशिव लोकसभा मतदारसंघात (Dharashiv Lok Sabha) देखील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यात आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बार्शीमध्ये धाराशिवच्या महायुती आणि राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्यासाठी प्रचारसभा घेतली.

तेव्हा देशाचे पंतप्रधान अमेरिकेजवळ जाऊन रडायचे, फडणवीसांची कॉंग्रेसवर सडकून टीका

राजेंद्र राऊत यांनी बार्शीचा विकास झाला. त्याचे श्रेय मला दिलं. मात्र बार्शीच्या या विकासाचा खरा भगीरथ ते स्वतः आहेत. त्यानंतर आज पुन्हा त्यांनी माझ्याकडे एक विकास कामांची यादी दिली आहे. तसेच राजाभाऊंवर माझे विशेष प्रेम आहे. तसेच मी तुमचा बिअरर चेक आहे. कारण महाराष्ट्राच्या खजिन्याची चावी जरी अजित दादांच्या हातात असली. तरी ते म्हणतात की, देवेंद्र फडणवीस यांनी सही केल्याशिवाय तो खजिना उघडणार नाही. त्यामुळे ही विकास कामांची यादी मी आजच मंजूर करतो. असं म्हणत फडणवीसांनी धाराशिवच्या मतदारांना विकासकामांचं आश्वासन दिलं.

त्यानंतर माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ माढ्यात फडणवीस यांची सभा झाली. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीकॉंग्रेसवर सडकून टीका केली. मोदींनी दहा वर्षात सशक्त भारत बनवला, आता पाकिस्तानही भारताकडे वाकड्या नजरेनं पाहत नाही. मात्र, आधी जेव्हा पाकिस्तानी भारतात बॉम्बस्फोट करायचे, तेव्हा देशाचे पंतप्रधान अमेरिकेजवळ जाऊन रडायचे, अशी टीका फडणवीसांनी केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube