तेव्हा देशाचे पंतप्रधान अमेरिकेजवळ जाऊन रडायचे, फडणवीसांची कॉंग्रेसवर सडकून टीका

तेव्हा देशाचे पंतप्रधान अमेरिकेजवळ जाऊन रडायचे, फडणवीसांची कॉंग्रेसवर सडकून टीका

Devendra Fadnavis On Congress : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections) पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टीकेच्या फैरी झाडत आहेत. आताही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) कॉंग्रेसवर सडकून टीका केली. मोदींनी दहा वर्षात सशक्त भारत बनवला, आता पाकिस्तानही भारताकडे वाकड्या नजरेनं पाहत नाही. मात्र, आधी जेव्हा पाकिस्तानी भारतात बॉम्बस्फोट करायचे, तेव्हा देशाचे पंतप्रधान अमेरिकेजवळ (America) जाऊन रडायचे, अशी टीका फडणवीसांनी केली.

तुमच्या एकीचे बळ मतांमध्ये दाखवा, फडणवीसांकडून निंबाळकरांच्या विजयाची जबाबदारी दोन्ही शिंदेंवर 

माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ रविवारी (28 एप्रिल) माढ्यात फडणवीस यांची सभा झाली. यावेळी व्यासपीठावर आरोग्यमंत्री तानाजी सावंत, आमदार बबनराव शिंदे, आमदार संजय शिंदे, करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप, रश्मी बागल आदी नेते उपस्थित होते.

यावेळी बोलतांना फडणवीस म्हणाले, मोदींनी दहा वर्षात सशक्त भारत बनवला. मोदींनी वीस कोटी लोकांना कच्च्या घरातून पक्क्या घरात आणलं. पन्नास कोटी लोकांना गॅस दिला. ५५ कोटांनी लोगांना शौचालय बांधून दिलं. ६० कोटी लोकांच्या घरी नळांच्या माध्यमातून शुध्द पाणी दिलं. साठ कोटी तरुणांना कर्ज देऊन तरुणांना आणि महिलांना स्वत:च्या पायावर उभं केलं, असं फडणवीस म्हणाले.

घरातील मंगळसुत्राची किंमत नाही, त्यांनी दुसऱ्याच्या मंगळसुत्राबद्दल काय बोलावं ? राऊतांची घणाघाती टीका 

लसीसाठी तरी मोदींना मत द्या
मोदींनी अनेक प्रकारचा विकास केला. मोदीजींमुळे खूप काम झाले; हा सगळा विकास सोडून द्या गोष्टी सोडून द्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविड काळात देश जिवंत ठेवण्याचे काम केले आहे. त्यामुळे कोविड लसीसाठी तरी मोदांना मतदान करावे, असे आवाहन फडणवीस यांनी केले आहे.

पंतप्रधान अमेरिकेजवळ जाऊन रडायचे
फडणवीस म्हणाले, आता पाकिस्तानही भारताकडे वाकड्या नजरेनं पाहत नाही. मात्र, आधी पाकिस्तानवरून आतंकवादी भारतात येऊन बॉम्बस्फोट करायचे आणि देशाचे पंतप्रधान अमेरिकेजवळ जाऊन रडायचे, अशी टीका फडणवीसांनी केली. ते म्हणाले, मोदींनी मात्र, थेट घुसून सर्जिकट स्ट्राईक केल्याचं फडणवीस म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube