तुमच्या एकीचे बळ मतांमध्ये दाखवा, फडणवीसांकडून निंबाळकरांच्या विजयाची जबाबदारी दोन्ही शिंदेंवर

तुमच्या एकीचे बळ मतांमध्ये दाखवा, फडणवीसांकडून निंबाळकरांच्या विजयाची जबाबदारी दोन्ही शिंदेंवर

Devendra Fadnavis Madha Speech : माढा लोकसभेत धैर्यशील मोहिते पाटलांनी (Dhairyashil Mohite Patil) आणि धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर (Uttam Jankar) यांच्या रूपाने भाजपला मोठे धक्के बसले. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवी (Devendra Fadnavis) अॅक्टिव्ह मोडवर आले आहेत. फडणवीसांनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांसाठी मोठी फिल्डिंग लावली आहे. त्यांनी निंबाळकरांच्या विजयासाठी जिल्ह्यातील नेत्यांची मोट बांधून निंबाळकरांना विजयी करण्याची जबाबदारी आमदार बबन शिंदे आणि संजय शिंदेवर टाकली.

अत्रे म्हणाले असते असा हरामखोर 10 वर्षात झाला नाही; राऊतांची अजित पवारांवर जहरी टीका 

रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या प्रचारार्थ आज माढ्यात देवेंद्र फडणवीसांनी सभा घेतली. यावेळी बोलतांना फडणवीस म्हणाले, रणजितसिंह नाईकांच्या नावासमोर असलेलं कमळाचं बटन दाबलं की, तुमचं मत थेट मोदींना मिळणार आहे. आता माढ्यात दोन्ही शक्ती एकत्रित आल्या आहेत. एकीकडे बबनदादा शिंदे आणि शिंदे परिवार आहे, तर दुसरीकडे सावतं परिवार आहे. हे दोन्ही परिवार आता एकत्र आले आहेत. संजयदादा, बबनदादा आता तुमच्या एकीचं बळं मला मतांतून दाखवा. तुमची सगळी ताकद मला मतांमध्ये दिसली पाहिजे, असं म्हणत फडणवीसांनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या विजयाची जबादारी सावंत आणि शिंदे परिवारावर टाकली आहे.

माढ्यात शिंदे कुटुंब आणि सावंत कुटुंब एकत्र आले. कारण मोदी है तो मुमकीन है. आता तुमच्या एकीचं बळ मला दाखवा. या निवडणुकीत तुमचे मत तुम्ही भाजपला नाही; तर मजबूत भारत बनवण्यासाठी देणार आहात, तुम्ही निंबाळकरांना नाही तर मोदींना मत देणार आहात, असंही फडणवीस म्हणाले.

एकच लावलंय बाप मारला, बाप मारला पण जनता आहारी जाणारी नाही; सावंतांचा पुन्हा निंबाळकरांवर हल्ला 

पुढं बोलतांना फडणवीस म्हणाले, गेल्या दहा वर्षात मोदींनी वीस कोटी लोकांना कच्च्या घरातून पकक्या घरात आणलं. पन्नास कोटी लोकांना गॅस दिला. ५५ कोटांनी लोगांना शौचालय बांधून दिलं. ६० कोटी लोकांच्या घरी नळांच्या माध्यमातून शुध्द पाणी दिल. सत्तर वर्षानंतरही मायमावल्या हंडा घेऊन नदीवर जायच्या मात्र मोदींनी ही पाण्यासाठीची भटकंती थांबवली, असं मोदी म्हणाले.

जे कॉंग्रेसला जमलं नाही, ते मोदींनी केलं
साठ कोटी तरुणांना कर्ज देऊन तरुणांना आणि महिलांना स्वत:च्या पायावर उभं केलं. शेतकऱ्यासाठी किसान सन्मान योजना आणला. पीकविमा आणला. साखर कारखानदारी आणि आणि उसाच्या शेतकऱ्यांसाठी मोदींनी अभूतपूर्ण निर्य घेतले. उसाला एमएसपी दिला. कारखानदारीवरील टॅक्स रद्द केला. साठ वर्षात जे कॉंग्रेसला जमलं नाही, ते मोदींनी केलं, अशा शब्दात फडणवीसांनी टीका केली.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube