एकच लावलंय बाप मारला, बाप मारला पण जनता आहारी जाणारी नाही; सावंतांचा पुन्हा निंबाळकरांवर हल्ला

एकच लावलंय बाप मारला, बाप मारला पण जनता आहारी जाणारी नाही; सावंतांचा पुन्हा निंबाळकरांवर हल्ला

Tanaji Sawant Criticize Om Raje Nimbalkar at Barshi : देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. यातच धाराशिव लोकसभा मतदारसंघात (Dharashiv Lok Sabha) देखील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यात आज पुन्हा आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी धाराशिवच्या महायुती आणि राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचार सभेत बोलताना पुन्हा एकदा ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

NIRRCH संस्थेत ‘या’ पदांसाठी भरती सुरू, महिन्याला मिळणार 70 हजार रुपये पगार

सावंत म्हणाले की, सर्वांच्या साक्षीने मी त्या माजी खासदाराला मोदींच्या साठी आणि विकासासाठी निवडून आणलं. पण ते 2009 पासून आज पर्यंत एकच सुरुवात माझा बाप मारला, माझा बाप मारला. तसेच आपण शेतकरी म्हणून एकदाच मडपीक घेतो. लोकांनी भावनेच्या आहारी जाऊन त्यांना एकदा आमदार केलं. मात्र त्यांना 2014 ला त्यांना घरी बसवलं. मात्र त्यानंतर निवडून आल्यानंतर आज 2024 पर्यंत यांनी सर्व जनतेचा बाप मारायला निघाले आहेत. त्यांनी एक रुपयाचा देखील विकास केला नाही. त्यामुळे हा मतदारसंघ भावनेच्या आहारी जाणार नाही. असं म्हणत तानाजी सावंत यांनी ओमराजे निंबाळकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

आता मालदीवमध्येही MDH-एव्हरेस्ट मसाल्यांवर बंदी, कॅन्सर सबस्टन्स इथिलील ऑक्साईड आढळले

या अगोदर तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी शिवसेनेच्या मेळाव्यात देखील निबांळकरांवर हल्लाबोल केला होता. ते म्हणाले होते की, 40 वर्षे मंत्री राहिलेल्या डॉ.पद्मसिंह पाटील आणि राणा पाटलांना मी गार करून आलोय, तू किस झाड की पत्ती है अशा शब्दांत त्यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना इशारा दिला होता.

धाराशिव लोकसभा मतदारसंघात ढोकी येथील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना परिसरात शिवसेनेच्या मेळाव्यात मंत्री तानाजी सावंत यांनी ओमराजे निंबाळकर यांच्यावर टीका करत म्हणाले होते की, सगळ्या सहकारी संस्थाची याने अन् याच्या बापाने वाट लावली. तेरणा बंद पाडला व अन् भंगार विकलं. खापर राणा दादांच्या वडिलांवर फोडलं , तुला लोकसभेत बसवण्यासाठी आम्ही जिवाचं राण केलं, या सावंत सरांनी तुझ्यासाठी या शेतकऱ्यांची कष्टाची साखर गोडावूनला होती ती 60 लाख क्विंटल विकली, अशा शब्दांत मंत्री तानाजी सावंत यांनी टीका केली होती.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube