Omraje Nimbalkar : शिंदे गटाच्या उमेदवारांची अभिजीत बिचुकले पेक्षाही वाईट परिस्थिती होईल

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 03 04T104622.218

ठाकरे गटाचे धाराशिवचे ( उस्मानाबाद ) खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव झाला आहे. यावरुन त्यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे. शिंदे गटाचे उमेदावर जर या निवडणुकीत उभे असते तर त्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली असती, असे ते म्हणाले आहेत.

भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कसबा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव झाल्यानंतर भाजपासारख्या पक्षाची जर अशी अवस्था असेल तर अजून शिंदे गटाचे उमेदवार उभे नाहीत, मात्र त्यांची अवस्था ही अभिजीत बिचुकले पेक्षाही वाईट होईल, असा खोचकटोला खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिंदे गटाला लगावला आहे.

या निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत रोड शो घेतला होता. त्यामुळे शिवसेनेची मते ही भाजपला मिळाली नाहीत, असे ठाकरे गटाचे नेते म्हणाले आहेत. तसेच कसब्यामध्ये भाजपचा उमेदावर हा शिवसेनेच्या मतांमुळे निवडून येत होते, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले आहेत. एवढचे नाही तर 2024 साली सांगलीमध्ये कसब्यासारखी स्थिती होईल, असे ते काल म्हणाले आहेत.

कसब्यात रासनेंच्या झालेल्या पराभवाचं खापर ‘या’ 6 नेत्यांवर फुटणार

दरम्यान शिंदे गटाने बंड केल्यानंतर देखील खासदार ओमराजे निंबाळकर हे उद्धव ठाकरेंसोबत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने ते शिंदे गटावर टीका करत आहेत. आता त्यांनी पुन्हा कसब्या निवडणुकीच्या निमित्ताने शिंदे गटावर निशाणा साधला आहे.

Tags

follow us