कसब्यात रासनेंच्या झालेल्या पराभवाचं खापर ‘या’ 6 नेत्यांवर फुटणार

कसब्यात रासनेंच्या झालेल्या पराभवाचं खापर ‘या’ 6 नेत्यांवर फुटणार

पुणे : पुण्यातील बहुचर्चित कसबा पोटनिवडणुकीत (Kasba by-election) भाजप (BJP) आणि शिंदे गटाने प्रतिष्ठा पणाला लावूनही अखेर पराभवाचा सामना केला. भाजपाचा वर्षानुवर्ष बालेकिल्ला राहिलेल्या कसब्यात तब्बल 28 वर्षांनंतर कसबा पोटनिवडणुकीत भाजपचा उमेदवार पराभूत झाला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी या निवडणुकीत भाजपचे उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasane) यांच्यावर तब्बल 11 हजार मतांनी मात करून विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीने भाजपच्या बालेकिल्ल्यात सुरुंग लावल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.

दरम्यान, कसब्यात भाजपचे बहुतेक नगरसेवक आणि कार्यकर्ते असतांना रासनेंचा झालेला पराभव हा पक्षाच्या जिव्हारी लागणारी आहे. त्यामुळे पक्षाकडून भाजपच्या सहा नेत्यांवर या पराभवाचं खापर फुटू शकतं. जाणून घेऊया कोण आहेत हे नेते?

माधुरी मिसाळ
पुण्यातील पर्वती या भागातून 10 वर्षे नगरसेविका म्हणून काम केल्यानंतर माधुरी मिसाळ यांनी आमदारकीची हॅट्ट्रिक केलीय. पुणे भाजपमधील एक वजनदार नेत्या म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्या कसबा पोटनिवडणूकीच्या प्रमुख होत्या. या कालावधीत त्यांनी कसब्यात ठाण मांडून प्रचार यंत्रनेचे नेतृत्व केलं. मात्र भाजपची हार झाल्यानं त्याचा थेट तोटा मिसाळ यांना होऊ शकतो.

मुरलीधर मोहोळ
मोहोळ यांच्याकडे कसब्यासह चिंचवडचीही जबाबदारी होती. मोहोळे हे पुण्याचे माजी महापौर आहेत. आणि शहराचं नेतृत्व म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जातं. कसब्याची मोठी जबाबदारी असतांना रासने यांच्या झालेल्या पराभवाची कारण त्यांनाही द्यावी लागतील.

राजेश पांडे
राजेश पांडे हे सध्या भाजपचे संघटन मंत्री असून पुणे शहराची सर्व जबाबदारी त्यांच्यावर आहे. कार्यकर्त्याचं नियोजन, त्यांना देण्यात येणाऱ्या सुचना आणि प्रचाराची यंत्रणा राबवण्यामध्ये पांडे यांचा मोठा वाटा आहे. कसब्यातील पराभवामुळे पांडेंनाही प्रश्ंनाना सामोरं जावं लागेल, यात शंका नाही.

Shinde VS Thackeray : शहाजी बापूंच्या किडन्या फेल होऊ दे विठुराया, ‘या’ माजी खासदाराची जीभ घसरली

जगदीश मुळीक
जगदीश मुळीक हे भाजपचे माजी आमदार असून ते सध्या भाजपचे शहर अध्यक्ष आहेत. त्यांच्या कालावधीत कसबा पोटनिवडणुकीत झालेला भाजपचा पराभव म्हणून त्यांना ही जबाबदारी टाळता येणार नाही. यासाठी पक्ष त्यांनाही जबाबदार धरेल आणि त्यांच्यावर कारवाई करेल

गणेश बिडकर
बिडकर हे फडणवीसांचे जवळचे नेते म्हणून ओळखले जातात. कसबा खरंतर त्याचं होम ग्राऊंड. रासनेंना उमेदवारी मिळाली असली तरी बिडकरही कसब्यातून पोटनिवडणूक लढण्यासाठी इच्छूक होते. पण हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर झाल्यानं बिडकर यांनी प्रचार यंत्रनेत काम केलं. दरम्यान, आता रासनेंचा पराभव झाल्यानं बिडकर यांनाही पक्षाकडून विचारणा होऊ शकते.

धीरज घाटे
धीरज घाटे हे देखील बिडकरांप्रमानेच कसब्याची निवडणूक लढण्यासाठी इच्छूक होते. त्यांनी निवडणुकीची तयारीही केली. मात्र, पक्षाने ऐनवेळी हेमंत रासनेंना उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर निवडणूक प्रचाराची जबाबदारी सांभाळली. त्यांनी रासनेंच्या प्रचारासाठी जोरदार प्रयत्न केले. मात्र, रासनेंचा पराभव झाला.

 

 

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube