माढा लोकसभेत नवा भूकंप, धैर्यशील मोहितेंच्या अर्जावर घेतली मोठी हरकत

माढा लोकसभेत नवा भूकंप, धैर्यशील मोहितेंच्या अर्जावर घेतली मोठी हरकत

Madha Loksabha : निवडणुका लागल्यानंतर गेली अनेक दिवसांपासून जो मतदारसंघ कायम चर्चेत राहीला तो मतदारसंघ म्हणजे माढा लोकसभा मतदारसंघ. भाजपकडून तिकीट न मिळाल्याने मोहिते पाटील काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर, मोहिते पाटलांनी भाजपला राम-राम ठोकला आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची वाट धरली. (Dhairyashil Mohite Patil) त्यानंतर त्यांना राष्ट्रवादीकडून माढा लोकसभेचं तिकीट मिळालं. मात्र, आता धैर्यशील मोहिते पाटील यांच्या उमेदवारी अर्जावर भाजपचे लोकसभेचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर (RanjitSingh Naik-Nimbalkar) यांनी हरकत घेतली आहे. त्यामुळे आता माढा लोकसभा (Madha Loksabha) मतदारसंघात नवीनच ट्विस्ट निर्माण झाला आहे.

 

मोहिते विरुद्ध निंबाळकर संघर्ष  

धैर्यशील मोहिते पाटील यांनी माढा लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यावेळी जी माहिती भरली आहे त्यामध्ये मोहिते पाटलांनी नोकरीचा तपशील भरला नसल्याची माहिती देत रणजितसिंह निंबाळकर यांनी हरकत घेतली आहे. आता निंबाळकर यांच्या हरकतीवर निवडणूक अधिकारी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, निंबाळकर यांनी ही हरकत घेतल्याने मोहिते विरुद्ध निंबाळकर हा संघर्ष पुन्हा एकदा समोर आला आहे.

 

निवडणूक अधिकारी काय निर्णय घेणार ?

भाजपकडून माढ्याची लोकसभेची उमेदवारी मिळत नसल्याचं लक्षात आल्यानंतर धैर्यशील मोहिते यांनी बंडाच निशाण फडकावलं. त्यानंतर मोहिते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश केला. त्यानंतर मोहिते पाटलांनी जोरदार तयारी सुरू केली. त्यांनी आपले राजकीय विरोधक उत्तम जानकर यांच्याशी हातमिळवणी केली आणि आपली बाजू भक्कम करण्याचा प्रयत्न केला. नुकता मोहिते पाटलांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र, निंबाळकर यांच्याकडून उमेदवारी अर्जावर हरकत घेतल्याने आता निवडणूक अधिकारी काय निर्णय घेतात हे महत्वाचं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube