‘निलेश लंकेंना संधी देण्यात माझाच पुढाकार’; अजितदादांनी सांगितली इनसाईड स्टोरी

‘निलेश लंकेंना संधी देण्यात माझाच पुढाकार’; अजितदादांनी सांगितली इनसाईड स्टोरी

Ajit Pawar On Nilesh Lanke : निलेश लंके (Nilesh Lanke) यांना संधी देण्यात माझाच पुढाकार असल्याचं सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी निलेश लंके यांच्या लोकसभा उमेदवारीबाबतची इनसाईड स्टोरीच सांगितलीयं. दरम्यान, अजित पवार यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती यांच्याकडून स्वतःच्या मुलाच्या कृत्याचा जाहीर निषेधमनमोकळ्या गप्पा मारल्या. या गप्पांमध्ये अजित पवारांनी अनेक गोष्टींचा खुलासा केलायं. यामध्ये निलेश लंके यांनी साथ सोडल्याबाबतही अजित पवार रोखठोक बोलले आहेत.

कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती यांच्याकडून स्वतःच्या मुलाच्या कृत्याचा जाहीर निषेध

अजित पवार म्हणाले, माझ्यासोबतचे आमदार गेले तरीही हरकत नाही. आम्ही पुन्हा नव्याने उभे करणार आहोत. आम्ही अनेकांना संधी दिलीयं, ते सगळे चांगल्या पदावर काम करीत आहेत. निलेश लंके यांना लोकसभेसाठी संधी देण्यात मीच पुढाकार घेतला होता. निलेश लंके यांनी लोकसभा हवी होती, तर सुनेत्रा पवार यांनी विधानसभा लढवावी अशी निलेश लंके यांची इच्छा होती. अहमदनगरमध्ये भाजपचा विद्यमान खासदार असल्याने निलेश लंकेंसाठी भाजपने जागा सोडली नाही, त्यामुळेच निलेश लंके यांनी शरद पवार गटाकडून निवडणूक लढवल्याचं खुद्द अजित पवार यांनी सांगितलंय.

तसेच अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची जागा धोक्यात असल्याची कल्पना भाजपला दिली होती. भाजपने ऐकलं होतं. मात्र, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी निलेश लंके यांना त्रास दिल्याचं लंकेंनी सांगितलं होतं. आपल्या जवळच्या लोकांच्या क्रेशर, खाणी बंद केल्याने फटका बसल्याचं लंके यांचं मत होतं. ज्यांनी त्रास दिलायं, त्यांच्यासोबत काम न करण्याची भूमिका लंके यांची होती. त्यामुळेच निलेश लंके यांनी शरद पवार गटात जात लोकसभा निवडणूक लढवली असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलंय.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी निलेश लंके यांची आधीपासूनच जोरदार तयारी असल्याचं दिसून येत होतं. लोकसभा जवळ येताच निलेश लंके आणि विखे कुटुंबियांमध्ये शाब्दिक युद्ध सुरु असल्याचं पाहायला मिळत होतं. या काळात विखे आणि लंकेंकडून एकमेकांवर जोरदार टीका-टीप्पणी केली जात होती. अखेर निलेश लंके यांनी शरद पवार गटाकडून निवडणूक लढवत विद्यमान खासदार सुजय विखे यांचा पराभव केलायं.

विधानसभेला 54 जागांचा दावा करणार…
महायुतीतील सर्वच पक्ष आपापला सर्व्हे करणार आहेत. तिघांचेही सर्व्हे समोर ठेवल्यानंंतर दोन सर्व्हे एका बाजूला जातील तिथं आमचा दावा असणार आहे. त्यामुळे ज्यांचे दोन सर्व्हेत येईल ते मान्य करणार असून 54 जागांवर दावा सांगणार असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलंय. तसेच 54 जागांमध्ये नवाब मलिक यांचाही समावेश असणार आहे. त्यामुळे राज्यातील एकूण 288 विधानसभा मतदारसंघात जिथं आमचे उमेदवार पुढे असतील त्या जागांवर दावा सांगणार असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलंय.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube