माढ्याचे खासदार निंबाळकरांच्या ताफ्यावर गाजरांचा पाऊस, संतप्त कार्यकर्त्यांनी केला निषेध
Ranjit Singh Naik-Nimbalkar : गेल्या पाच वर्षांत मतदारसंघात फारसे न फिरकलेले भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर (Ranjit Singh Naik-Nimbalkar) यांना संतप्त मतदारांच्या रोषाला सामोरे जावं लागलं. आपण माढा लोकसभा (Madha Lok Sabha) मतदारसंघात पाच वर्षांत एक लाख कोटी रुपयांचा विकास निधी आणण्याचा दावा केल्यानंतर आज निंबाळकर यांना हे त्यांच्या मतदारसंघात असतांना भाजप (BJP) कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर ताफ्यावर गांजरांचा पाऊस पाडून त्यांचा निषेध केला. यावेळी माढ्याचे अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदे हे देखील खासदार निंबाळकर यांच्यासोबत होते.
नवनीत राणा भाजपात जाण्याची चर्चा, बच्चू कडू म्हणतात, ‘त्यांचं अंतर्मनच भाजपचं…’
रणजितसिंह निंबाळकर हे रविवारी माढा विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर होते. विविध विकासकामांचे उद्घाटन खासदार निंबाळकर व आमदार बबनराव शिंदे यांच्या हस्ते होणार होते. मात्र, कार्यक्रमस्थळी जात असतांना त्यांच्यावर संतप्त लोकांनी गाजरं फेकले. या घटनेची चित्रफित सोशल मीडियावर व्हायरल झाली असून त्यात पोलिस संरक्षणात निघालेल्या खासदार निंबाळकर यांच्या गाडीवर काही तरुण गाजरं फेकताना दिसत आहेत. माढा तालुक्यातील रांझणी गावाजवळ ही घटना घडली.
नवनीत राणा भाजपात जाण्याची चर्चा, बच्चू कडू म्हणतात, ‘त्यांचं अंतर्मनच भाजपचं…’
रांझणी-आलेगाव-गार-अकोले-टाकळी-आढेगाव या नवीन रस्त्याच्या भूमिपूजन समारंभासाठी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार बबनराव शिंदे आले होते. त्यांच्यासोबत पोलिस बंदोबस्तही होता. मात्र स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्या वाहनांवर तीन ते चार क्विंटल गाजर फेकले. त्यामुळे गाजरांचा अक्षरश: रस्तावर सडा पडला आहे.
आंदोलन करणारे गार अकोला येथील भाजप कार्यकर्ते सतीश सुरेश केचे यांनी आपली बाजू मांडली. ते म्हणाले, खासदार निंबाळकर नेहमीच खोटी आश्वासने देतात आणि केवळ विकासाचे गाजर दाखवतात. त्यांच्या वागण्याने आणि खोट्या बोलण्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपची प्रतिमा मलिन होत असल्याचा आरोप केचे यांनी केला. विकास दाखवण्याच्या खोट्या वृत्तीचा निषेध म्हणून खासदार निंबाळकर यांच्या वाहनांवर गाजरांचा वर्षाव केल्याचे ते म्हणाले.
तर दुसरीकडे या संदर्भात खासदार निंबाळकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी असा कोणताही विरोध केला नाही. आपला माढा तालुक्याचा दौरा कोणत्याही अडचणीविना पार पडला, असा दावा त्यांनी केला.