दिवसभर माझ्याबरोबर प्रचार अन् रात्री नितीन गडकरींसोबत चर्चा; काँग्रेस नेत्याचा खळबळजनक आरोप

दिवसभर माझ्याबरोबर प्रचार अन् रात्री नितीन गडकरींसोबत चर्चा; काँग्रेस नेत्याचा खळबळजनक आरोप

Congress leader Vikas Thackeray : काँग्रेस नेते विकास ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीसंदर्भात खळबळजनक दावा केला आहे. लोसभेच्या काळात काँग्रेसचे काही नेते गडकरींच्या फोन कॉलमुळे घरी शांत बसून राहिले होते, असा खळबळजनक आरोप काँग्रेस नेते विकास ठाकरे यांनी केला आहे. काँग्रेसचे हे नेते दिवसा पक्षाचा प्रचार करायचे आणि रात्री नितीन गडकरी यांच्याशी संवाद साधायचे, असंही विकास ठाकरे म्हणाले आहेत. त्यांच्या या दाव्यामुळे मोठी चर्चा सुर झाली आहे.

फोनवर बोलायचे

विकास ठाकरे यांनी नागपूर लोकसभा मतदारसंघातून नितीन गडकरी यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. या लढाईत विकास ठाकरे यांचा तब्बल लाखभरापेक्षा अधिक मतांनी पराभव झाला. या निवडणुकीला काही महिने उलटल्यानंतर आता विकास ठाकरे यांनी काँग्रेसच्याच स्थानिक नेत्यांवर धक्कादायक आरोप केले आहेत. काही नेते दिवसभर माझ्यासोबत फिरायचे आणि रात्री नितीन गडकरी यांच्यासोबत फोनवर बोलायचे. अशा सर्व नेत्यांची यादी आमच्याकडे असल्याचं विकास ठाकरे यांनी सांगितलं आहे.

Blast Karachi Airport: कराची विमानतळावर मोठा स्फोट; दोघांचा मृत्यू तर ८ जण गंभीर जखमी

लोकसभा निवडणुकीत कुणी काम केलं, कुणी काम केलं नाही, अशा सर्वांची यादी आपल्याकडं आहे. मात्र, मी त्या सर्वांना माफ केलं आहे. मात्र, आता विधानसभा निवडणुकीमध्ये माझी नजर त्या सर्वांवर राहील. पक्षाच्या अधिकृत उमेदवारांशी जो कोणी गद्दारी करेल, त्यांना पक्षाने बाहेरचा रस्ता दाखवावा, अशी मागणी विकास ठाकरे यांनी केली आहे.

त्यांनी नीट विचार करावा

नागपुरात आम्ही सत्तर लोकांनी पक्षाची उमेदवारी मागितली असली तरी फक्त सहा जणांना उमेदवारी मिळेल. ज्यांना उमेदवारी मिळेल त्यांच्या पाठीमागे सर्वांनी उभं राहण्याची गरज असल्याचं सांगताना विकास ठाकरे यांनी संभाव्य बंडखोरांना सक्त ताकीद ही दिली. काँग्रेस मधील जे कोणी अधिकृत उमेदवाराच्या विरोधात बंडखोर उमेदवार उभे करण्याचा विचार करत आहेत, अशा नेत्यांना सांगणं आहे की त्यांनी नीट विचार करुन निर्णय घ्यावा, असा इशारा विकास ठाकरे यांनी दिला. ते नागपुरात काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube