Blast Karachi Airport: कराची विमानतळावर मोठा स्फोट; दोघांचा मृत्यू तर ८ जण गंभीर जखमी
Explosion Outside Karachi Airport : पाकिस्तानमधील कराची विमानतळाबाहेर काल रविवार रात्री उशिरा मोठा स्फोट झाला, ज्यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला तर किमान आठ जण जखमी झाले आहेत. (Karachi) बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने (बीएलए) हा स्फोट घडवून आणला असल्याची सुत्रांची माहिती आहे. यामध्ये ज्यांनी जीव गमावला आहे ते दोघेही चिनी नागरिक आहेत. जखमींमध्ये अनेक पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.
मोठी बातमी! गाझातील मशीदी अन् शाळांवर इस्रायलचा हवाई हल्ला, 24 जण ठार
पाकिस्तानमधील चिनी दूतावासाने एक निवेदन जारी करून या स्फोटाबाबत नाराजी व्यक्त केली असून चिनी नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेण्याच्या सक्त सूचना पाकिस्तानला दिल्या आहेत. यासोबतच चिनी दूतावासाने पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या चिनी नागरिकांना आणि चालू प्रकल्पांशी संबंधित लोकांना सतर्क राहण्यास आणि स्थानिक लोकांवर बारीक लक्ष ठेवण्यास सांगितलं आहे.
चिनी दूतावासाने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, ‘6 ऑक्टोबर रोजी रात्री 11:00 वाजता, दहशतवाद्यांनी कराचीतील जिना आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ चिनी अर्थसहाय्यित पोर्ट कासिम पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेडच्या ताफ्यावर हल्ला केला, ज्यामध्ये दोन चिनी कर्मचारी ठार झाले आहेत. एक चिनी कामगार जखमी झाला असून आणि पाकिस्तानमधील काही लोक जखमी झाले आहेत.