Karachi To Noida Teaser: सीमा हैदरच्या लव्हस्टोरीवर आधारित ‘कराची टू नोएडा’ सिनेमाचा टीझर रिलीज

Karachi To Noida Teaser: सीमा हैदरच्या लव्हस्टोरीवर आधारित ‘कराची टू नोएडा’ सिनेमाचा टीझर रिलीज

Karachi To Noida Teaser: पाकिस्तानची सीमा हैदर (Seema Haider) आणि भारतामधील सचिन (Sachin) या जोडप्याच्या लव्हस्टोरीवर आधारित असणाऱ्या ‘कराची टू नोएडा’ या सिनेमाचा धमाकेदार टीझर रिलीज करण्यात आला. या टीझरची जोरदार चर्चा सध्या सोशल मीडियावर होत असल्याचे बघायला मिळत आहे. सिनेमाचे निर्माते अमित जानी (Amit Jani) यांनी ‘कराची टू नोएडा’ या सिनेमाचा धमाकेदार टीझर सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by JANI FIREFOX (@janifirefox)


अमित जानी यांनी ‘कराची टू नोएडा’ या सिनेमाचा टीझर सोशल मीडियावर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “कराची टू नोएडा’ या बहुप्रतिक्षित अॅक्शन आणि थ्रिलर सिनेमाचा धमाकेदार टीझर सादर करत आहोत. हा सिनेमा 2024 ला रिलीज करण्यात आला आहे. अमित जानी यांनी सोशल मीडियावर या सिनेमाचा टीझर शेअर करत या सिनेमाच्या स्टार कास्टची देखील माहिती दिली आहे. या सिनेमात दीप राज राणा, एहसान खान, रोहित चौधरी, मनोज बक्षी, फरहीन फलक आणि आदित्य राघव या कलाकारांनी मुख्य भूमिका साकारली आहे. जयंत सिन्हा यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. तर अमित जानी आणि भरत सिंह यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे.

अमित जानी या सिनेमाची कथा आणि संवाद लिहिले आहेत. तर अभिनेत्री फरहीन फलक ही ‘कराची टू नोएडा’ या सिनेमात सीमा हैदरची मुख्य भूमिका साकारणार आहे. गेल्या काही दिवसांपासून मिथिलेश भाटी यांचा ‘लप्पू सा सचिन, झिंगूर सा लडका’ हा डायलॉग सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता. आता ‘कराची टू नोएडा’ या सिनेमाच्या टीझरमधील “मेरे पति को लप्पू कहने से पहले अपने बुड्ढे को भी देखले. वो, कौनसा सनी देओल है?” हा डायलॉग सध्या चर्चेचा विषय बनला आहे. तसेच ‘कराची टू नोएडा’ या सिनेमाच्या टीझरमधील इतर डायलॉग्सची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगत आहे.

Songya Movie: स्त्री संघर्षाचा वेध घेणारा ‘सोंग्या’ चित्रपट ‘या’ दिवशी येणार भेटीला

सीमा आणि सचिन यांची लव्हस्टोरीची चर्चा गेल्या काही दिवसांपासून देशातच नाही तर परदेशात देखील होत असल्याचे बघायला मिळत आहे. सीमा आणि सचिन यांची ओळख PUBG या गेमिंग अॅपच्या माध्यमातून झाली आहे. सुरुवातीला त्यांची मैत्री झाली आणि नंतर मैत्रीचं रूपांतर प्रेमात झाल्याचे बघायला मिळालं. सचिनच्या प्रेमासाठी सीमा थेट पाकिस्तान सोडून भारतात आली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube