Songya Movie: स्त्री संघर्षाचा वेध घेणारा ‘सोंग्या’ चित्रपट ‘या’ दिवशी येणार भेटीला
Songya Movie: आपल्या समाजामध्ये अनेक प्रथा परंपरा आहेत, त्या जशा चांगल्या आहेत, तशाच काही कुप्रथा देखील आहेत. (Songya Movie) ज्या स्त्रियांवर अन्याय करतात, केवळ अशिक्षित स्त्रिया नाही तर शिक्षित स्त्रिया ही त्यामध्ये भरडल्या जात असतात. (Marathi Movie) तसेच काही मुलींची स्वप्न धुळीला मिळत असतात. अशाच एका वाईट प्रथेविरुद्ध उभी राहते एक तरुणी, तिचं प्रेम, तिची स्वप्न, इच्छा सर्व मोडून सुरु करते एक अनोखा संघर्ष. या अनोख्या संघर्षातून तिचं अपेक्षित ध्येय साध्य होणार का?
या अनोख्या संघर्षाची रंजक कथा सांगणारा निरामि फिल्म्सची निर्मिती असलेला मिलिंद इनामदार (Milind Inamdar) दिग्दर्शित ‘सोंग्या’ हा मराठी चित्रपट 15 डिसेंबरला चाहत्यांचे मनोरंजन करायला येत आहे. त्याअगोदर या चित्रपटाचं एकदम धमाकेदार पोस्टर चाहत्यांच्या भेटीला आलं आहे.
रूढी परंपरांच्या जोखडात अडकलेल्या स्त्री वेदनेचा वेध परखडपणे घेत हेच दृष्टीकोन सामोरे ठेवून समाजपरिवर्तनाचा प्रामाणिक प्रयत्न ‘सोंग्या’ या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून असणार असल्याचे दिग्दर्शक मिलिंद इनामदार यांनी यावेळी सांगितले आहे.
‘सोंग्या’ मराठी चित्रपटातील मुख्य भूमिकेमध्ये ऋतुजा बागवे, अजिंक्य ननावरे, गणेश यादव, अनिल गवस, प्रदीप डोईफोडे आदि दर्जेदार कलाकार बघायला मिळणार आहेत. निशांत काकिर्डे, राहुल पाटील, मिलिंद इनामदार ‘सोंग्या’ या मराठी चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटाचे गीतलेखन गुरु ठाकूर यांनी केले आहे.
संगीत विजय गवंडे यांचे आहे. आदर्श शिंदे, स्वप्नील बांदोडकर, मनिष राजगिरे, योगेश चिकटगावकर, स्वप्नजा लेले, अमिता घुंगरी यांचा स्वरसाज चित्रपटातील गीतांना यांचा मधुर आवाज लाभला आहे. छायांकन अरविंद कुमार तर संकलन निलेश गावंड यांचे आहे.