बलुचिस्तानमध्ये ईद-ए-मिलादच्या मिरवणुकीत मोठा स्फोट; 52 ठार, अनेक जखमी
Blast In Balochistan : बलुचिस्तानमध्ये ईद-ए-मिलादच्या मिरवणुकीत मोठा स्फोट झाला असून, स्फोटात ठार झालेल्यांमध्ये एका पोलीस उपअधीक्षकासह (DSP) 52 हून जण ठार झाले आहेत, तर 130 हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. बलुचिस्तानमधील मस्तुंग जिल्ह्यातील अल-फलाह मशिदीजवळ ईद मिलाद-उल-नबीच्या मिरवणुकीला लक्ष्य करून स्फोट घडवण्यात आला आहे. या भीषण घटनेत जखमी झालेल्या नागरिकांवर जवळील रूग्णालयामध्ये उपचार सुरू असून, घटनेची दाहकता बघता मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
धक्कादायक! देशातील 42 टक्के ग्रॅज्यूएट बेरोजगार; एमबीए, इंजिनिअरांना व्हायचंय ‘कारकून’
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मस्तुंगचे डीएसपी नवाज गशकोरी यांचा या स्फोटोत मृत्यू झाला असून, अद्यापर्यंत या स्फोटाची जबाबदारी कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारलेली नाही. याआधी मस्तुंग जिल्ह्यात सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीला एक भीषण स्फोट घडवून आणण्यात आला होता. त्यात जमियत उलेमा-ए-इस्लाम फझलचे (JUI-F) नेते हाफिज हमदुल्लासह अनेक जण जखमी झाले होते. त्यानंतर महिनाभरात झालेला हा दुसरा भीषण स्फोट आहे.
तुमच्या खिशात असणाऱ्या दोन हजारांच्या नोटांबाबत RBI देणार ‘गुड न्यूज’
पाकिस्तानात हल्ल्यांची मालिका सुरूच
पाकिस्तानमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने हल्ले होण्याची मालिका सुरूच आहे. यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये मस्तुंगच्या काबू हिल परिसरात दोन वाहनांना लक्ष्य करत स्फोट घडवून आणण्यात आला होता. या घटनेत तीन जण ठार झाले होते, तर सहा जण जखमी झाले होते. तर, यावर्षी जानेवारी महिन्यात क्वेट्टा येथील मशिदीत स्फोट झाला होता ज्यात दहा जण ठार झाले होते. तर अनेक नागरिक जखमी झाले होते. पाकिस्तान दीर्घकाळापासून बलुचिस्तानमधील अतिरेक्यांच्या बंडाशी लढत आहे. या वादातूनच येथे सातत्याने अशाप्रकारेचे भीषण स्फोट घडवून आणले जात असून, यात बळी मात्र सामान्या नागरिकांचा जात आहे. त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन जगावे लागत आहे.