‘एकतर तुमचा कार्यक्रम नाहीतर माझा कार्यक्रम…’; मंत्री राधाकृष्ण विखे पाटील असं का म्हणाले?

‘एकतर तुमचा कार्यक्रम नाहीतर माझा कार्यक्रम…’; मंत्री राधाकृष्ण विखे पाटील असं का म्हणाले?

Radhakrushna Vikhe Patil : आज मी तीस वर्षे शिर्डीचा आमदार आहे. साईबाबांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे मी साई संस्थान कर्मचाऱ्यांच्यावतीने अभिनंदन करतो. साई संस्थानच्या प्रशासकीय समितीने प्रस्तावाला तातडीने मान्यता दिली. त्यामुळे आपण हा कार्यक्रम करू शकलो. नाहीतर मी दोन दिवस चिंतेत होतो की, एकतर कर्मचाऱ्यांचा कार्यक्रम होईल, नाहीतर माझा कार्यक्रम होईल, असं विखे पाटलांनी (Radhakrushna Vikhe Patil) मिश्किल वक्तव्य करताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

राहुल गांधींनी नेहमीच देशाची सुरक्षा अन् भावना दुखवल्या; अमित शाहांचा ‘एक्स’वर वार

साईबाबा संस्थानमधील सुमारे 598 कर्मचारी आणि आउटसोर्सिंगमधील कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करून घेण्याबाबतचा महत्वपूर्ण निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. संस्थानच्या त्रिसदस्यीय समितीने सरकारात्मक अंमलबजावणी करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला. आज या ऐतिहासिक निर्णयाचे नियुक्तीपत्र कर्मचाऱ्यांना सुपूर्द करण्यात आले. महसुल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी या कामाबाबत पाठपुरावा केला होता. दरम्यानच्या काळात कर्मचाऱ्यांचा संघर्षही मोठा झाला होता. अशा सर्व परिस्थितीत कामगारांना न्याय मिळवून देण्याचा शब्द विखे पाटलांनी दिला होता. त्याची वचनपूर्ती या निर्णयाने करता आल्याचे मला समाधान वाटत असल्याचं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले आहेत.

“जोपर्यंत भाजप आहे तोपर्यंत आरक्षण..” राहुल गांधींच्या ‘त्या’ वक्तव्यांवर अमित शाह संतप्त

आम्ही फोटो काढत बसत नाही…पिपाडांना टोला

साईबाबा संस्थानमधील सुमारे 598 कर्मचारी आणि आउटसोर्सिंगमधील कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करून घेण्याचा निर्णय झाला. यासाठी अनेक बैठका घेण्यात आल्या. मात्र आम्ही प्रसिद्धीसाठी हे काही करत नाही. आपल्याकडे घुसपेठींची संख्या वाढलीयं. चांगलं काम काही लोकांना पचनी पडत नाही, अशा शब्दात मंत्री राधाकृष्ण विखे यांनी भाजपचे राजेंद्र पिपाडा यांचा नामोउल्लेख टाळत त्यांच्यावर टीका केली. तसेच आम्ही जो शब्द दिला तो पूर्ण केल्याचा आनंद आम्हाला आहे असं यावेळी मंत्री विखे म्हणाले. दरम्यान, सरकारमार्फत घेण्यात आलेल्या या निर्णयानंतर पिपाडा यांनी या कामासाठी आपण पाठपुरावा केल्याचे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल केले होते. यावर विखे यांनी भाष्य केलंय.

विमानतळाला विरोध करणारे स्वतःच विमानातून फिरतायत :
काही वर्षांपूर्वी आम्ही शिर्डी येथे विमानतळ करण्याचा निर्णय घेतला. मात्र, काही विरोधकांनी या गोष्टीला विरोध केला, तरीही आम्ही विमानतळ उभारले. या विमानतळाला विरोध करणारे स्वतःच आता बाहेरच्या राज्यात या विमानाने प्रवास करत आहेत, अशा शब्दांत मंत्री विखे यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतलायं. तसेच शिर्डीमधील विमानतळ हे साईभक्तांसाठी आहे कारण देशातून तसेच विदेशातून भक्त साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीमध्ये येत असतात, असं वक्तव्य यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube