“जोपर्यंत भाजप आहे तोपर्यंत आरक्षण..” राहुल गांधींच्या ‘त्या’ वक्तव्यांवर अमित शाह संतप्त

“जोपर्यंत भाजप आहे तोपर्यंत आरक्षण..” राहुल गांधींच्या ‘त्या’ वक्तव्यांवर अमित शाह संतप्त

Amit Shah replies Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी अमेरिका दौऱ्यात आरक्षणावर एक वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर देशभरातून टीकेची झोड उठली आहे. भाजप नेत्यांकडूनही राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. यातच आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी राहुल गांधींवर घणाघाती टीका केली. अमित शाह यांनी एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी राहुल गांधींच्या अमेरिकेतील वक्तव्यांवर प्रतिक्रिया दिली आहे.

देशाविरोधात वक्तव्ये करणाऱ्या शक्तींसोबत उभे राहणे ही राहुल गांधी आणि काँग्रेसची (Congress Party) सवयच झाली आहे. मग ते जम्मू काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) देशविरोधी आणि आरक्षण विरोधी अजेंडा असो की विदेशात भारतविरोधी वक्तव्ये देणे असो. राहुल गांधींनी नेहमीच देशाच्या भावनांना दुखावण्याचं काम केलं आहे.

Rahul Gandhi : महाराष्ट्राने करून दाखवलं; परदेशात जाऊन राहुल गांधींनी केलं महाराष्ट्राचं कौतुक

भाषा-भाषांत, प्रांता-प्रांतात आणि धर्मा-धर्मात भेदभाव निर्माण करण्याबाबत बोलणे, यातून राहुल गांधी यांचे फूट पाडण्याचे विचार स्पष्टपणे दिसून येत आहेत. देशातून आरक्षण संपवण्याबद्दल बोलून राहुल गाधींनी पुन्हा एकदा काँग्रेसचा आरक्षणविरोधी चेहरा समोर आणला आहे. जे विचार त्यांच्या मनात होते ते आता शब्दरुपाने बाहेर आले आहेत. मी राहुल गांधींना सांगू इच्छितो की जोपर्यंत भाजप आहे तोपर्यंत कुणीही आरक्षणाला धक्का लावू शकत नाही आणि देशाच्या सुरक्षेशीही छेडछाड करू शकत नाही.

काय म्हणाले होते राहुल गांधी ?

राहुल गांधी यांनी अमेरिकेतील एका कार्यक्रमादरम्यान आरक्षण संपुष्टात आणण्याबाबत मोठं वक्तव्य केलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की, काँग्रेस पक्ष आरक्षण संपवण्याचा विचार तेव्हाच करेल जेव्हा भारतात आरक्षणाच्या बाबतीत निष्पक्षता असेल आणि आता तशी परिस्थिती नाही. वॉशिंग्टनमधील प्रतिष्ठित जॉर्जटाउन विद्यापीठातील विद्यार्थ्यांना संबोधित करताना राहुल यांनी हे विधान केल होतं.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube