Rahul Gandhi : महाराष्ट्राने करून दाखवलं; परदेशात जाऊन राहुल गांधींनी केलं महाराष्ट्राचं कौतुक

  • Written By: Published:
Rahul Gandhi : महाराष्ट्राने करून दाखवलं; परदेशात जाऊन राहुल गांधींनी केलं महाराष्ट्राचं कौतुक

Rahul Gandhi US Visit : भारतीय राजकारणातून प्रेम, आदर आणि मानवता यांचा लोप झाला आहे. (Rahul Gandhi) चांगली कौशल्ये असलेल्या लोकांना जाणीवपूर्वक दूर ठेवलं जात आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली. दरम्यान, अमेरिका दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही टीका केली.

video : भारतातील आरक्षण केव्हा संपणार?, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच मोठ विधान

राहुल गांधी यांनी आज डल्लास येथील टेक्सास विद्यापीठात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, भारत आणि अमेरिकेसह अनेक देशांना सध्या बेरोजगारीची समस्या भेडसावत आहे. चीन मात्र या समस्येपासून दूर असून जागतिक उत्पादनात ते आघाडीवर आहेत. भारत आणि पाश्‍चिमात्य देशांनी उत्पादनाकडं दुर्लक्ष केल्यानेच असं झालं आहे. त्यामुळे भारतात उत्पादनावर भर देणं आवश्‍यक आहे. यामुळे नोकऱ्यांची निर्मिती होईल. यासाठी मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू करणं आवश्‍यक आहे. याकडं दुर्लक्ष केल्यास अनेक सामाजिक प्रश्‍न निर्माण होतील. भारतात राजकारणाचं ध्रुवीकरण यामुळेच झालं आहे. शिक्षण व्यवस्था आणि व्यवसाय यांच्यातील दरी भरून काढण्यासाठी व्यावसायिक शिक्षण देण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

कौशल्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा मुद्दा मांडताना राहुल गांधी म्हणाले, भारतात कौशल्याची कमतरता नाही. मात्र, कौशल्य असलेल्या व्यक्तींना कायम दूर ठेवलं जातं. महाभारतातही एकलव्याच्या हाताचा अंगठा कापल्याची कथा आहे. ही कथा भारतात दररोज लाखो लोकांच्या बाबतीत घडत आहे असंही राहुल गांधी म्हणाले आहेत. भारतात कौशल्याचा आदर झाला तर देशाची क्षमता कितीतरी पटींनी वाढेल. कौशल्याला आर्थिक बळ आणि तंत्रज्ञानाचे सहकार्य दिले जाणं आवश्‍यक आहे. केवळ एक-दोन टक्के लोकांना बळ देऊन तुम्ही देशाची ताकद वाढवू शकत नाहीत असंही ते म्हणाले आहेत.

संघाचा विश्‍वास एकाच विचारसरणीवर

राहुल गांधी यांनी डल्लास येथील भारतीय समुदायाशीही संवाद साधला. यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली. ते म्हणाले, भारत हा एकाच विचारापासून बनला आहे, असं संघाचे म्हणणं आहे. मात्र, भारत हा विविध विचारांचा सन्मान करणारा देश आहे, असं आमचं म्हणणं आहे. प्रत्येकाला संधी मिळायला हवी, असे अमेरिकेप्रमाणे आमचेही म्हणणे आहे. कोणताही भेदभाव न बाळगता प्रत्येकाला स्वप्न पाहण्याचा आणि ते पूर्ण करण्याचा अधिकार असावा. भारताचे पंतप्रधान राज्यघटनेवरच हल्ले करत असल्याचे नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भारतीयांना समजले आहे असंही ते म्हणाले.

जर निष्पक्ष निवडणुका झाल्या असत्या तर भाजपाला राहुल गांधींचा खळबळजनक खुलासा

महाराष्ट्राने करून दाखवले

भारताने उत्पादनावर भर दिला आणि कौशल्यांचा आदर करण्यास सुरुवात केली तर, चीनशी स्पर्धा शक्य असल्याचा विश्‍वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला. भारतातील राज्यांनी हे करून दाखवलं आहे. तमिळनाडू, महाराष्ट्र यांनी करून दाखवलं आहे. त्यामुळे उत्पादनावर लक्ष दिलं जात असलं तरी त्याचे प्रमाण कमी आहे आणि त्यासाठी व्यापक समन्वय आवश्‍यक आहे, असे राहुल गांधी म्हणाले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube