Laxman Hake : सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला, कारखाना चालवला अन् मुख्यमंत्री व्हायचंय…

सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला, कारखाना चालवला अन् मुख्यमंत्री व्हायचंय, या शब्दांत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मंत्री विखेंचा समाचार घेतला.

Laxman Hake : ... म्हणून शरद पवार भुजबळांची भेट, लक्ष्मण हाकेंचा मोठा खुलासा

Laxman Hake on Radhakrushna Vikhe Patil : सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला, कारखाना चालवला अन् मुख्यमंत्री व्हायचंय, या शब्दांत ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा खरपूस समाचार घेतलायं. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यात वातावरण तापलेलं असतानाच ओबीसी-मराठा संघर्ष सुरु असल्याचं चित्र आहे. अशातच हाके यांनी विखे पाटलांवर खोचक टीका केलीयं.

पुढे बोलताना हाके म्हणाले, विखे पाटील कारखानदारांचा नेता आहे. विखे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले त्यांची पाचवी पिढी महाराएष्ट्राच्या राजकारणात आहे. कारखानदारी करुन पैसे कमवणे आणि त्या पैशांमधून निवडणूक जिंकणे याशिवाय यांनी केलंच काय? विखेंच्या नावाने सामान्य माणासाठी कोणती चळवळ आहे काय…विखे पाटलांना काय माहिती सामाजिक न्याय..मराठा आरक्षणासाठी जी समिती नेमली तीच बेकायदेशीर , अशी समिती जर एक जीआर काढते अन् ओबीसीतून आरक्षण देते तर मग काय अभ्यास केलायं विखे पाटलांनी, असा खोचक सवाल हाके यांनी केलायं.

कन्फर्म! DQ41 मध्ये पूजा हेगडेची एन्ट्री; मेकर्सकडून घोषणा अन् खास वेलकम

तसेच जयश्री पाटील, केसमध्ये गायकवाड आयोगाचा आठशे पानांचा सर्वोच्च न्यायालयाचा युक्तिवाद आहे. त्यातली पाच सहा पाने वाचली तरी का. विखेंचं एकच दुखणं, मला मुख्यमंत्री व्हायचं. महाराष्ट्रात पाच ते सहा जिल्ह्यात प्रभाव निर्माण करुन मुख्यंमत्री होता येतं, त्यासाठी रात्रंदिवस फिरावं लागतं, आता तुम्ही सोडूनच द्या आता दीनदलित लोकं मुख्यमंत्री ठरवतील, असंही हाकेंनी स्पष्ट केलंय.

देशाला मिळाले 15 वे उपराष्ट्रपती; सीपी राधाकृष्णन यांचा शपथविधी सोहळा संपन्न

आरक्षणाबाबतचं खरं सांगायची हिंमत इथल्या राजकीय नेत्यांमध्ये नाही. ओबीसींचं काय नुकसान होईल हेही सांगायचं धाडसं नाही. यामध्ये मरण एकच ओबीसींचं आरक्षण संपतंय. आम्हीही उत्तरला प्रत्युत्तर देऊ, मोर्चा काढू आंदोलने करु, प्रसंगी मुंबईला जाऊ पण ओबीसींचा आवाज बुलंद करु, असाही इशारा त्यांनी यावेळी दिलायं. जर दहा टक्के लोकांची काळजी असेल तर आम्ही पन्नास टक्के आहोत. ओबीसी जागा झाला तर वारंवार कारखानदाराचे नेते निवडून येतात ना त्यांच्याऐवजी महाराष्ट्राचे खरे फुले शाहू आंबेडकरांचे वारस नेते होतील,असंही ते म्हणाले आहेत.

मनोज जरांगे हा चावडीवर बसणारा गावगुंडा आहे. लक्ष्मण हाकेवर आत्तापर्यंत सातवेळा हल्ले झाले आहेत. हे असंच काही बरळंत राहील त्याच्या डोक्यावर परिणाम झालायं. आम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाहीत. आत्तापर्यंत लाखो बोगस प्रमाणपत्राचे वाटप झाले आहे. शासन बेजबाबदारपणे वागतोयं. जर राजाचं असं वागत असेल तर जायंच कुठं, हा खूप मोठा अन्याय आहे. शासनाच्या प्रतिनिधीने आमच्या समोर यावं या जीआरचा अर्थ आम्ही त्यांना सांगू, असंही ते म्हणाले आहेत,.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube