“अजित पवार तुम्ही पोल्ट्रीवरचे कामगार शोभता…”; आयपीएस अंजना कृष्णा प्रकरणात लक्ष्मण हाकेंचे टीकास्त्र

Laxman Hake criticises Ajit Pawar on IPS Anjana Krishna : अजित पवार आणि आयपीएस अंजना कृष्णा यांचे फोनवरील संभाषणाचे प्रकरण सध्या चर्चेत आहे. आयपीएस अंजना कृष्णा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संभाषणाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये अजित पवार आयपीएस अंजना यांना फोनवरुन दम देत असल्याचे पाहायला मिळते. या प्रकरणावरुन अजित पवारांवर प्रचंड टीका होत आहे. या प्रकरणात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही आता अजित पवार यांच्यावर निशाणा साधत टीकास्त्र सोडले आहे.
Kim Jong Un विरोधात अमेरिका ॲक्शन मोडमध्ये, जपान अन् दक्षिण कोरियासह करणार संयुक्त लष्करी सराव
काय म्हणाले लक्ष्मण हाके?
सोलापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात लक्ष्मण हाके (Laxman Hake) बोलत होते. यावेळी लक्ष्मण हाके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि आमदार अमोल मिटकरी यांच्यावर टीका केली. लक्ष्मण हाके (Laxman Hake) म्हणाले, “अजित पवार यांनी यशवंतराव चव्हाण यांचे नाव घेऊ नये. त्यांनी शरद पवार यांचा वारसा सांगू नये. अजित पवार (Ajit Pawar) तुम्ही पोल्ट्रीवरचे कामगार शोभता. यूपीएससी झालेल्या अधिकाऱ्याला दम देणे त्यांना शोभत नाही. त्यांनी भाषा सुधारावी. जर ते होत नसेल, तर यशवंतराव चव्हाण यांचे नाव घेऊ नये”, असे वक्तव्य लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी केले आहे.
विमान सेवेत त्रुटी आढळल्यास प्रवाशांना मिळणार मोठं गिफ्ट; Air India मोठ्या निर्णयाच्या तयारीत..
तुम्हाला कारखाना चालवण्याशिवाय दुसरं काय जमतं?
पुढे लक्ष्मण हाके (Laxman Hake) म्हणाले की, “अजित पवार, तुम्हाला बाबासाहेब वगैरे कळणार नाही. तुमची कुवत किंवा लायकी नाही. तुम्हाला कारखाना चालवण्याशिवाय दुसरं काय जमतं?” असे म्हणत लक्ष्मण हाके यांनी उपमुख्यमंत्र्यांवर (Ajit Pawar) टीका केली आहे.
“…म्हणुनच राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना”, जयंती सोहळ्यात फडणवीसांचे गौरवोद्गार
अमोल मिटकरी रॉकेल चोर
अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह अमोल मिटकरी यांच्यावरही लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी टीकास्त्र सोडले आहे. लक्ष्मण हाके यांनी मिटकरींना ‘रॉकेल चोर’ म्हटले आहे. ते म्हणाले, “अमोल मिटकरी नावाचा रॉकेल चोर वरिष्ठ सभागृहात पाठवला. त्या सभागृहाचा तुम्ही अपमान केला आहे. त्या अमोल मिटकरीमुळे तुम्ही किती वेळा तोंडावर पडणार? अमोल मिटकरी हा मुक्त विद्यापीठापासून ग्रॅज्युएट झाला आणि त्याला वरिष्ठ सभागृहात सदस्य केले. यूपीएससीचा लाँग फॉर्मतरी माहिती आहे का? अमोल मिटकरी हा कोणत्याही समाजाला टार्गेट करतो. अजित दादा तुम्हाला अमोल मिटकरी तोंड काळं करायला लावणार”, अशा शब्दांत लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी अजित पवार (Ajit Pawar) आणि अमोल मिटकरी यांचा खरपूस समाचार घेतला आहे.