विमान सेवेत त्रुटी आढळल्यास प्रवाशांना मिळणार मोठं गिफ्ट; Air India मोठ्या निर्णयाच्या तयारीत..

Air India News : देशात मागील काही दिवसांत मोठ्या विमान दुर्घटना झाल्या आहेत. या अपघातांत शेकडो निष्पाप लोकांचा मृत्यू झाला आहे. अपघात कमी करण्याच्या उद्देशाने विमान कंपन्यांकडून प्रयत्न केले जात आहेत. यातच आता एअर इंडिया एअरलाइन्सचे प्रमुख कॅम्पबेल विल्सन यांनी महत्वाची माहिती दिली आहे. एअर इंडियाचा आकार पाहता दुर्घटना होणे स्वाभाविक आहे. विमान उड्डाणादरम्यान प्रवाशांना जर कंपनीच्या सेवेत काही त्रुटी अथवा कमतरता आढळून आल्यास त्याची भरपाई म्हणून ई व्हाउचर देण्याची योजना आखली जात आहे.
विमान प्रवास नेहमीच आरामदायक (Air India) मानला जातो. पण अलीकडच्या काळात विमान क्रॅश होणे आणि अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. बऱ्याचदा विमान प्रवासादरम्यान प्रवाशांना अडचणी जाणवतात. विमान कंपनीच्या सेवांवर नाराजी व्यक्त केली जाते. विमानात तांत्रिक बिघाड झाला तर तासनतास विमानतळावरच अडकून पडावे लागते. उड्डाणे रद्द केली जातात. यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो.
एअर इंडियाकडून मृतदेहांची अदलाबदली, तब्बल 12 चुकीचे मृतदेह ब्रिटिश कुटुंबांना सोपवले…
प्रवासी कंपनीकडे तक्रारी करतात. या सगळ्या गोष्टींचा विचार करून आता एअर इंडियाने खास योजना तयार केली आहे. सर्व एअरलाइन्स कंपन्यांप्रमाणे यालाही विविध प्रकारच्या परिचालन परिस्थितींचा सामना करावा लागतो. यातील काही गोष्टी कंपनीच्याही नियंत्रणात नाहीत तर काही गोष्टी नियंत्रणात आहेत असे कॅम्पबेल विल्सन यांनी सांगितले.
एअर इंडियाच्या कामाचा व्याप वाढता
ज्यावेळी आपल्याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते त्यावेळी स्पष्ट आणि अचूक माहिती देणे तसेच योग्य संदर्भ देणे महत्वाचे ठरते. त्यामुळे अलीकडच्या काळात आपण घटना आणि या घटनांचे रिपोर्ट तयार करण्यात अधिक पारदर्शक राहिलो आहोत असे विल्सन यांनी कर्मचाऱ्यांना दिलेल्या एका संदेशात म्हटले आहे. पारदर्शकता वेळेसह विश्वास तयार करण्यात मदत करू शकते.
सुरुवातीच्या टप्प्यात आम्ही प्रत्येक लहानमोठ्या घटनेची माहिती उघडपणे देत असल्याने आमच्या नावाचा उल्लेख वारंवार होतो. एअर इंडिया ग्रुप दररोज 1200 पेक्षा जास्त विमान उड्डाणे संचालित करतो. म्हणजेच एका मिनिटाला एक उड्डाण अशी स्थिती आहे. त्यामुळे कंपनीचा आकार कामाचा व्याप पाहता अशा घटना होणे सहाजिक आहे असेही त्यांनी सांगितले. जर विमान कंपनीच्या सेवेत काही कमतरता जाणवली आणि प्रवाशांनी जर तक्रार केली तर त्यांना ई व्हाउचर देण्यात येतील. त्यामुळे प्रवाशांच्या तक्रारी तत्काळ सोडवण्यास मदत होणार आहे. यासाठी आमच्या फ्रंटलाईन टीम्सना अधिकार देण्यात आले आहेत असेही त्यांनी सांगितले.
एअर इंडिया विमान अपघाताच्या अहवालावर मंत्री मोहोळ म्हणाले, पायलटचं संभाषण म्हणजे