Kim Jong Un विरोधात अमेरिका ॲक्शन मोडमध्ये, जपान अन् दक्षिण कोरियासह करणार संयुक्त लष्करी सराव

Donald Trump On Kim Jong Un : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गेल्या काही दिवसांपासून अनेक धक्कादायक निर्णय घेत असल्याने जागतिक राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे. नुकतंच त्यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला होता तर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी एक मोठा निर्णय घेतल्याने अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहे.
सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, अमेरिका (America) सप्टेंबर महिन्यात जपान (Japan) आणि दक्षिण कोरियासोबत (South Korea) संयुक्त लष्करी सराव करणार आहे. माहितीनुसार, 15 सप्टेंबरपासून अमेरिका जपान आणि दक्षिण कोरियासोबत संयुक्त लष्करी सराव करणार आहे. या सरावादरम्यान लढाऊ विमाने आणि क्षेपणास्त्र ट्रॅकिंग सिस्टम यांचा वापर होणार आहे.
तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि उत्तर कोरियामध्ये तणाव निर्माण झाल्याने अमेरिकाने मोठा निर्णय घेत जपान आणि दक्षिण कोरियासह संयुक्त लष्करी सराव करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उत्तर कोरियाला हा मोठा धक्का मानला जात आहे.
लष्करी सराव का होणार?
सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, उत्तर कोरियाचे प्रमुख शासक किम जोंग उन कोरियन द्वीपकल्पात सतत क्षेपणास्त्र चाचण्या करत आहेत. याशिवाय, जोंग यांच्या संभाव्य आक्रमकतेची शक्यता व्यक्त केली जात असल्याने 15 सप्टेंबरपासून अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरियाने संयुक्त लष्करी सराव करण्याचा निर्णय घेतला आहे.
अंजली कृष्णा प्रकरण, अंजली दमानियांची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार; अजित पवारांच्या अडचणी वाढणार?
तर दुसरीकडे 18 ऑगस्ट रोजी अमेरिकेने दक्षिण कोरियासोबत संयुक्त लष्करी सराव केला होता. या सरावाला उल्ची फ्रीडम शील्ड असे नाव देण्यात आले होते. यानंतर हे ‘चिथावणीखोर कृत्य’ आहे असा इशारा उत्तर कोरियाने दिला होता.