कन्फर्म! DQ41 मध्ये पूजा हेगडेची एन्ट्री; मेकर्सकडून घोषणा अन् खास वेलकम

दाक्षिणात्य अभिनेता दुलकर सलमानच्या आगामी DQ41 चित्रपटात अभिनेत्री पूजा हेगडेची एन्ट्री झाली आहे.

Dq41 Movie

Pooja Hegde Entry in DQ41 Movie : दाक्षिणात्य अभिनेता दुलकर सलमानच्या आगामी DQ41 चित्रपटात अभिनेत्री पूजा हेगडेची एन्ट्री झाली आहे. जवळपास तीन वर्षांनंतर पूजा टॉलीवूडमध्ये पुनरागमन करत आहेत. या बातमीने इंटरनेटवर खळबळ उडाली आहे. आज SLV सिनेमाजने याबाबत अधिकृत घोषणा केली. शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओत पूजा अगदीच सिंपल आणि गर्ल नेक्स्ट डोर अंदाजात दिसत आहे.

या व्हिडिओला मेकर्सने सुंदर कॅप्शन लिहिले (Dulquer Salman) आहे. या कॅप्शनची जोरदार चर्चा सुरू आहे. “मनमोहक पूजाचे DQ41 मध्ये स्वागत”, अशा कॅप्शनच्या ओळी आहेत. या सिनेमातील प्रमुख अभिनेता दुलकर सलमान आणि पूजा हेगडेची (Pooja Hegde) केमिस्ट्री मोठ्या पडद्यावर जादूई सिद्ध होईल असे चित्रपटाच्या निर्मात्यांनी म्हटले आहे.

Sanki: अहान शेट्टीसोबत रोमान्स करताना दिसणार पूजा हेगडे, आगामी सिनेमाची केली घोषणा

प्रसिद्ध दिग्दर्शक रवि नेलाकुडिटी चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. SLV सिनेमाज द्वारे चित्रपट प्रोड्यूस केला जात आहे. या चित्रपटात पूजा हेगडेच्या एन्ट्रीने तिच्या चाहत्यांना एक सुखद धक्का दिला आहे. आता या चित्रपटात पूजा आणि दुलकर यांची मोठ्या पडद्यावरील केमिस्ट्री पाहण्यास प्रेक्षक कमालीचे उत्सुक आहेत. हा चित्रपट पूजासाठी महत्वाचा आहे. याव्यतिरिक्त पूजा वरुण धवनसोबत ‘है जवानी तो इश्क होना है’ या चित्रपटातही दिसणार आहे. याचबरोबर तिच्याकडे ‘जया नायकन’, ‘सूर्या 44’ यांसारखे बिग बजेट चित्रपट आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube