लाडकी बहीण योजनेला विरोध करणाऱ्या सावत्र भावांना ओळखा…विखेंचा विरोधकांना खोचक टोला
Radhakrishna Vikhe Patil : राज्यात लाडकी बहीण योजनेवरून (Ladki Bahin Yojana) राजकारण चांगलंच तापलं आहे. यातच आता राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी महाविकास आघाडीच्या (MVA) नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. लाडकी बहीण योजनेला विरोध करणाऱ्या सावत्र भावांना ओळखा अशी टीका विखेंनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे शुभारंभाच्या वेळी केली. तसेच महायुती सरकार घोषणा करणारे नव्हे तर अंमलबजावणी करणारे आहे. असं देखील यावेळी विखे म्हणाले.
17 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह महीला बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ करण्यात आले. या कार्यक्रमाला दूरदृष्य प्रणालीने विखे सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना विखे म्हणाले की, या योजनेलाविरोध करणाऱ्या सावत्र भावांना ओळखा, महायुती सरकारने सर्व लाडक्या बहीणीच्या अर्थिक उत्कर्षा करीता ही योजना सुरू केली आहे. महायुती सरकारने केवळ घोषणा केली नाही तर या योजनेची अंमलबजावणी करून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात पैसे देखील जमा केले. तसेच उर्वरीत खात्यात आधार कार्ड लिंक झाल्यानंतर पैसे जमा होतील असेही विखे पाटील म्हणाले.
याचबरोबर राज्य सरकारने महिलांसाठी अनेक योजना सुरु केल्या आहे त्यामध्ये बस भाड्यामध्ये पन्नास टक्के सवलत, विद्यार्थ्यांनीना मोफत शिक्षण, तिर्थदर्शन योजना आणि बचत गटाच्या माध्यमातून अनुदान देण्याचे काम सुरु असल्याची देखील माहिती विखेंनी यावेळी दिली.
पुण्यात धक्कादायक प्रकरण,अल्पवयीन मुलींचे अश्लील फोटो व्हायरल; गुन्हा दाखल
तर दुसरीकडे जिल्ह्यात अंगणवाडी सेविका ग्रामसेवक यांनी केलेल्या चांगल्या कामामुळे सात लाख महीलांचे अर्ज मंजूर झाले असून ही योजना पुढेही चालू रहाणार आणि या योजनेचे हप्ते खात्यात जमा होणार असा विश्वास देखील विखेंनी उपस्थित महिलांना यावेळी दिला. तर सर्व उपस्थित महिलांनी मंत्री विखेंना राखी बांधून योजनेचा आंनद साजरा केला.