विरोधक विरोध करतायंत पण, लाडक्या बहिणींना पैसे मिळणारच; आदिती तटकरेंनी सुनावलं
Aaditi Tatkare : विरोधकांंना विरोध करायचायं म्हणून ते करीत आहेत, पण लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळणारच या शब्दांत महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aaditi Tatkare) यांनी विरोधकांना सुनावलंय. दरम्यान, मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार टीका टिप्पणी सुरु असल्याचं चित्र आहे. त्यावर बोलताना तटकरेंनी सुनावलंय.
महाविकास आघाडीत जागावाटपाचं ठरलं…बाळासाहेब थोरात काय म्हणाले?
आदिती तटकरे म्हणाल्या, विरोधक लाडकी बहिण योजनेचा विरोध करायचा म्हणून करत आहेत,ज्या अर्थी जनतेचा प्रतिसाद महायुतीच्या योजनांना मिळत आहे, त्यामुळे योजनांना विरोध करण्याचा अपयशी प्रयत्न विरोधक करत आहेत. जे योजनांवर टीका करत आहेत तेच त्यांच्या मतदारसंघातील सर्वात जास्त नोंदणी करून घेत आहेत. त्यामुळे अशी दुटप्पी भूमिका विरोधकांकडून पाहायला मिळत आहे. मात्र जनता या भूलथापांना बळी पडणार नसल्याचं आदिती तटकरेंनी स्पष्ट केलंय.
तसेच या योजनेसाठी 46 हजार कोटी रुपये लागणार असून अर्थ विभागाने निधी वितरीत केलायं. 17 तारखेचा पहिल्या हप्त्याचा निधीसह पुढील सहा महिन्यांची तरतूद करण्यात आलीयं. त्यानंतर होणाऱ्या अर्थसंकल्पात सादर होईल ते उपलब्ध होईल”, अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली.
video: पुणेकराने थांबवली आमदाराची गाडी; सायरन वाजवला म्हणून झाप झाप झापलं; पाहा व्हिडिओ
लाडकी बहीण योजनेसाठी नाव नोंदणी आजही सुरू असून सरकारने अडीच कोटी महिलांना योजनेचा लाभ देण्याचा अंदाज काढला होता. नोंदणीचा आकडा आजच्या घडीला दीड कोटींपर्यंत पोहोचला आहे. योजनेची केवळ घोषणा झाली तशा अफवा पसरल्या जात आहेत. मात्र 17 तारखेला महिलांच्या खात्यामध्ये पैसे पडल्यानंतर नोंदणी अधिक वाढेल. राज्य शासनाने आणलेली ही योजना चालूच राहणार आहे”, अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिलीयं.
दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घोषित झाल्यापासून या योजनेचा अपप्रचार विरोधकांकडून केला जातोय. लाखोंच्या संख्येने ज्या अर्थी महिला नोंदणी करतात त्याअर्थी त्यांनाही योजना आवडलेली आहे. या योजनेमुळे त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडणार आहे. कुठल्याही दुसऱ्या योजनेवर लाडली बहीणमुळे अजिबात परिणाम पडलेला नाही”, अशीदेखील माहिती अदिती तटकरे यांनी यावेळी दिली.