महायुतीचं सरकार आल्यास लाडक्या बहिणींना दोन हजार रुपये देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलीयं. जळगावात ते बोलत होते.
तुमचं सरकार दीडचं महिने, त्यामुळे चांगला राज्यकारभार चालवायला शिका, या शब्दांत राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी मुख्यमंत्री शिंदेंना खडसावलंय. ते अहमदनगरमध्ये बोलत होते.
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या एका लाडक्या बहिणीने पैशांमधून व्यवसाय सुरु करुन दीड हजारांची गुंतवणूक करुन दहा हजार रुपये कमवले आहेत.
आमचं हप्ते जमा करणारं सरकार असून पूर्वीसारखं हप्ते घेणारं सरकार नसल्याची खोचक टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केलीयं. ते कोल्हापुरात आयोजित मेळाव्यात बोलत होते.
'खोडा घालणाऱ्या सावत्र भावांना कोल्हापूरी जोडा दाखवा, या शब्दांत योजनांचा पाढा वाचत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना चपराक लगावलीयं. ते कोल्हापुरात आयोजित मेळाव्यात बोलत होते.
हौशे, गौशे, नौश्यांच्या गोष्टींना बळी पडू नका, या शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर कडाडले आहेत. ते कोल्हापुरात आयोजित मेळाव्यात बोलत होते.
विरोधक लाडकी बहीण योजनेत खोडा घालण्याचा प्रयत्न करत असल्याचे टीकास्त्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. दरम्यान, मुंबईत ते माध्यमांशी बोलत होते.
मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने सांगतो, पैसे परत घेणार नाही, अशी सारवासारव उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार रवी राणा यांच्या वादग्रस्त विधानावर केलीयं. ते जळगावमध्ये बोलत होते.
मी गंमतीने बोललो, असल्याचं स्पष्टीकरण आमदार रवी राणा यांनी दिलं आहे. दरम्यान, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरुन त्यांनी वादग्रस्त विधान केलं होतं.
विरोधकांंना विरोध करायचायं म्हणून ते करीत आहेत, पण लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळणारच या शब्दांत अदिती तटकरे विरोधकांना सुनावलंय.