मी गंमतीने बोललो; ‘पैसे परत काढून घेणार’ म्हणणाऱ्या रवी राणांचं स्पष्टीकरण
Mla Ravi Rana : राज्यात सध्या लाडक्या बहिण योजनेवरुन चांगलच रान पेटलंय. एकीकडे सत्ताधाऱ्यांकडून मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेची जोरदार जाहिरातबाजी सुरु आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडी टीकेची झोड उठवण्याची कोणतीही संधी सोडताना दिसत नाही. अशातच आता आमदार रवि राणा (Mla Ravi Rana) यांनी एका मेळाव्यात बोलताना बहिणींनी आशिर्वाद दिला नाही तर 1500 रुपये परत काढून घेणार असल्याचं विधान केलं. या विधानानंतर विरोधकांनी टीकेचा सूर लावताच मी गंमतीने बोललो असल्याचं स्पष्टीकरण आमदार राणा यांनी दिलं आहे.
छगन भुजबळ तुला चष्मा उचलना…तलवार कधी उचलायची; जरांगेंची खोचक टोलेबाजी
राज्यसभरात सध्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी सत्ताधारी अजित पवार गटासह महायुतीतील सर्वच घटक पक्षांकडून कंबर कसण्यात येत आहे. अशातच अमरावतीमधील सांस्कृतिक भवनात लाडक्या बहिणींचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात संबोधित करताना रवि राणा म्हणाले, आमचं सरकार आलं तर आम्ही 1500 रुपयांवरुन 3 हजार रुपये करु, मात्र तुम्हा मला आशिर्वाद नाही दिला तर मीही तुमचा भाऊ आहे, तुमच्या खात्यातून ते पंधराशे रुपये परत घेईन, असं रवि राणांनी लाडक्या बहिणींना उद्देशून म्हटलं.
माझ्या जीवाला धोका, पण माझ्या बहिणींचे आशीर्वाद अन्…; अजितदादांचं धुळ्यात मोठं विधान
आमदार रवि राणा यांनी हे विधान केल्यानंतर राज्यभरातून त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली. हा पैसा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रवि राणा यांच्या बापाचा आहे काय? निवडणुकीच्या मतदानासाठीच ही योजना या नालायक लोकांनी आणलीयं असल्याचा हल्लाबोल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलायं. तर राणा असं बोलले असतील तर ते चुकीचं आहे, हा राज्यातील महिलांचा अपमान आहे ही योजना चिरंतन चालवण्याची सरकारची भूमिका असल्याचं आमदार प्रविण दरेकर यांनी स्पष्ट केलंय.
दरम्यान, राज्यातील नेत्यांकडून टीका होताच रवि राणा यांनी या विधानावरुन आपलं स्पष्टीकरण दिलंय. ते म्हणाले, आपण गमतीने हे वक्तव्य केलं. बहीण भावाचे नाते आपुलकीचे असलं पाहिजे. मी जे गमतीने बोललो त्याचा विरोधक बाऊ करत आहे. लाखो महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्याच्यामध्ये कुठेही कुणालाही वाईट वाटेल असं वक्तव्य केलं नव्हतं. भाऊ हा बहिणीचं कुठेही काढून घेऊ शकत नाही, उलट भाऊ हा बहिणीला मदत करतो. त्यामुळे कुणाचेही पैसे काढून घेण्यात येणार नाही, असं रवि राणांनी स्पष्ट केलंय.