रवी राणांची जेपी नड्डांच्या जागी नेमणूक झालीये का?, संजय राऊतांचा खोचक टोला

Sanjay Raut : विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर ठाकरे गटाची (UBT) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. यावरुनच आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांनी मोठं विधान केलं. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व स्वीकारतील आणि अशी छुपी रणनीती सुरू असल्याचं राणा म्हणाले होते. यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाष्य केलं.
वाल्मिक खडा तो वो सरकारसे बडा !!; आव्हाडांनी पुन्हा लक्ष वेधलं
रवी राणा यांची जे. पी. नड्डा यांच्या जागी नेमणूक करण्यात आलीय का? असा खोचक सवाल राऊतांनी केली.
पुण्यात आज ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. ते म्हणाले, महापालिका तसंच जिल्हा परिषदेच्या निडवणुका होणार असल्यानं पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांची आज बैठक घेण्यात आली. या बैठकीत संघटनात्मक बांधणीकडं लक्ष देणं गरजेचं आहे, यासह अनेक विषयावर चर्चा झाली. बैठकीत काही पदाधिकाऱ्यांनी स्वबळाचा नारा दिला, तर काहींनी महाविकास आघाडीसोबत लढलं पाहिजे, असं सांगितलं. पुणे महानगरपालिका आम्ही पूर्ण ताकदीने लढणार आहोत, असं म्हणत राऊतांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीची तयारीला लागण्याचे निर्देश दिले.
67 लाख 50 हजारांचे बक्कळ पॅकेज देणारी सरकारी नोकरीची जाहिरात निघाली, वाचा डिटेल्स
महाविकास आघाडी ही विधानसभेच्या निवडणुकीसाठी तयार झाली होती. तर ‘इंडिया’ आघाडी लोकसभा निवडणुकीसाठी तयार झाली होती. आता याचा वापर स्थानिक पातळीवर कशा पद्धतीने करायचा, हे तिन्ही पक्षांचे नेते एकत्र बसून ठरवतील, असंहीराऊत म्हणाले.
रवी राणांच्या वक्तव्यावर बोलतांना ते म्हणाले, रवी राणा यांची जे. पी. नड्डा यांच्या जागी नेमणूक करण्यात आलीय का? शिवसेना हा एक स्वतंत्र पक्ष असून, शिवसेनेला एक मोठी परंपरा आहे. जेव्हा हा पक्ष स्थापन झाला तेव्हा या व्यक्तीचा (रवी राणा) जन्मही झाला नव्हता, असं टोला राऊतांनी लगावला.
रवी राणा काय म्हणाले?
रवी राणा म्हणाले की, उद्धव ठाकरेंची फडणवीस यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात छुपी रणनीती सुरू आहे. संजय राऊत यांना याची कल्पनाच नाही. ते आधाीही अंधारात होते आणि आताही अंधारात आहे.