67 लाख 50 हजारांचे बक्कळ पॅकेज देणारी सरकारी नोकरीची जाहिरात निघाली, वाचा डिटेल्स

  • Written By: Published:
67 लाख 50 हजारांचे बक्कळ पॅकेज देणारी सरकारी नोकरीची जाहिरात निघाली, वाचा डिटेल्स

Post for SEBI Chief : शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रत्येकाचे गडेलठ्ठ पगार देणारी सरकारी नोकरी मिळावी असे स्वप्न असते. त्यासाठी अनेकजण प्रयत्न करत असतात. तुम्हीदेखील अशाच बक्कळ पगार देणाऱ्या नोकरीच्या शोधात असाल तर, तुमच्यासाठी एक मस्त संधी चालून आली आहे. थोडा थोडका नव्हे तर, तब्बल 5 लाख 62 हजार एवढा पगार म्हणजेच वार्षीक 67 लाख 50 हजारांचे पॅकेज असणाऱ्या पदासाठी सरकारने सोमवारी (दि.27) जाहिरात काढली आहे. या पदासाठी कोण अर्ज करू शकतो? अनुभवाच्या अटी नेमक्या काय याबद्दल जाणून घेऊया.

Video: आता गुन्ह्यातील पुरावा टेम्पर करणं अवघड; आरोपींना घाम फोडणारी यंत्रणा फडणवीसांकडून लॉन्च

कोणत्या पदासाठी काढण्यात आली आहे जाहिरात?

केंद्र सरकारकडून आज (दि27.) प्रकाशित करण्यात आलेली ही जाहिरात सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या (SEBI) प्रमुख पदासाठी काढण्यात आली आहे. सध्या या पदावर माधबी पुरी बुच (Madhabi Puri Buch) या कार्यरत असून, त्यांचा कार्यकाळ 28 फेब्रुवारी 2025 रोजी संपुष्टात येणार आहे. बुच यांच्याआधी अजय त्यागी आणि यूके सिन्हा या दोघांनाही सेबीचे प्रमुख म्हणून मुदतवाढ मिळाली होती. पण आज जाहिरात प्रकाशित करण्यात आल्याने माधबी पुरी बुच यांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता कमी झाली आहे.

कधीपर्यंत करता येणार अर्ज?

सेबीच्या प्रमुख पदावर अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 17 फेब्रुवारी 2025 पर्यंत अर्ज करता येणार आहे. नियामक म्हणून सेबीची भूमिका आणि महत्त्व लक्षात घेऊन, उमेदवाराकडे उच्च सचोटी, स्थायी आणि 50 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आणि 25 वर्षांपेक्षा जास्त व्यावसायिक अनुभव असणे आवश्यक आहे असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. ही नियुक्ती पाच वर्षांसाठी किंवा उम्मीदवाराचे वय 65 वर्षांपर्यंत असेल.

बजेटपूर्वीच सरकारची मोठी घोषणा, ‘या’ लोकांना होणार बंपर फायदा, 1 एप्रिलपासून लागू होणार UPS योजना

कुणाला करता येणार अर्ज?

प्रकाशित जाहिरातीत अध्यक्ष पदावर काम करणारी व्यक्तीचा पदावर असताना त्याच्या कामावर विपरीत परिणाम होणार नाही अशी असावी असे नमुद केले आहे. तसेच सरकार वित्तीय क्षेत्र नियामक नियुक्ती शोध समितीच्या (FSRASC) शिफारसीनुसार सेबी प्रमुखाची नियुक्ती करेल. तसेच या पदासाठी अर्ज न केलेल्या पण गुणवत्तेच्या आधारावर इतर कोणत्याही व्यक्तीची शिफारस करण्यास समिती स्वतंत्र असेल असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

2 मार्च रोजी बुच यांनी स्वीकरला होता पदभार

सेबीचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला म्हणून बुच यांनी 2 मार्च 2022 रोजी तीन वर्षांच्या कालावधीसाठी सेबीच्या प्रमुख पदाचा कारभार स्वीकारला होता. मात्र, SEBI च्या कर्मचाऱ्यांनी अयोग्य कामकाजाच्या पद्धती विरुद्ध विरोध केल्यानंतर बुच यांचा कार्यकाळ मोठ्या वादात सापडला होता. परंतु, बुच यांनी त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फोटाळून लावले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube