सेबीच्या अध्यक्षांचा अदानींच्या शेअर घोटाळ्यात हात, हिंडेनबर्गच्या नव्या अहवालात मोठा आरोप
Madhavi Puri Buch : अदानी समूहाविरोधात खळबळजनक अहवाल सादर करणारी हिंडनबर्ग (Hindenburg) ही कंपनी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अमेरिकन शॉर्ट सेलर फर्म हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूहाशी संबंधित एका प्रकरणात पुन्हा एकदा नवा दावा (Hindenburg New Report) केला. हिंडेनबर्ग रिसर्चने सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी बुच (Madhavi Puri Buch) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
‘गांढूळ नाही, हे मोदींसमोर वळवळ करणारे मांढूळ’, ठाकरेंचा पुन्हा शिंदेंवर घणाघात
NEW FROM US:
Whistleblower Documents Reveal SEBI’s Chairperson Had Stake In Obscure Offshore Entities Used In Adani Money Siphoning Scandalhttps://t.co/3ULOLxxhkU
— Hindenburg Research (@HindenburgRes) August 10, 2024
अदानींच्या शेअर बाजार घोटाळ्यात माधवी पुरी बुच यांचा सहभाग असल्याचे हिंडेनबर्ग रिसर्चने नव्या अहवालात केलं.
हिंडेनबर्ग रिसर्चने शनिवारी दावा केला की सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) च्या अध्यक्षा माधबी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांनी अदानींच्या पैशांचा वापर करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ऑफशोर संस्थांमध्ये भाग घेतला होता. या अहवालात म्हटलं की, पुरावे असूनही त्यांच्या विरुध्द आणि अदानी समूहाविरुद्ध सेबीने कोणतीही सार्वजनिक कारवाई केली नाही.
याशिवाय, हिंडेनबर्ग रिसर्चने भारताशी संबंधित आणखी एक महत्त्वाचा खुलासा केला. शनिवारी (10 ऑगस्ट) हिंडेनबर्ग रिसर्चने X वर पोस्ट केली. त्यात लिहिलंकी, भारतात लवकरच काहीतरी मोठे होणार आहे.
दरम्यान, अदानींच्या शेअर बाजार घोटाळ्यात माधवी पुरी बुच यांचा सहभाग असल्याने गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे.