दिल्लीत शरद पवारांच्या निवास्थानी स्नेहभोजन; उद्योगपती गौतम अदानी उपस्थित
या आधी राज्यसभेच्या कार्यकाळ संपणाऱ्या खासदारांसाठी शरद पवार स्वतः स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करतात.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा येत्या 12 डिसेंबर रोजी वाढदिवस साजरा केला जाणार आहे. (Loksabha) त्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील निवासस्थानी त्यांनी खासदारांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन केलं आहे. या कार्यक्रमाला अनेक नेत्यांसह उद्योगपती गौतम अदानीही उपस्थित राहिले आहेत.
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकमेकांच्या विरोधात निवडणुकीत उभारल्याचं दिसून आलं. परंतु, शरद पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मात्र दोन्ही राष्ट्रवादीचे नेते, खासदार पवारांच्या घरी दिसून आले आहेत. या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला उद्योजक गौतम अदानी यांनी उपस्थिती लावली. त्याचसोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ, मनिष तिवारी यांच्यासह अनेक नेतेही उपस्थित राहिल्याचं दिसून आलं.
देशाच्या स्यायत्त संस्थांनावर पूर्ण कब्जा, लोकसभेत राहुल गांधींचा भाजप आरएसएसवर वार
या आधी राज्यसभेच्या कार्यकाळ संपणाऱ्या खासदारांसाठी शरद पवार स्वतः स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करतात. तसंच महाराष्ट्रातील एखाद्या खासदाराचा कार्यकाळ संपणार असेल तर त्याच्या स्नेहभोजनासाठी शरद पवार कार्यक्रम आयोजित करतात. आता शरद पवारांचा राज्यसभेचा कार्यकाळ हा जून महिन्यात संपणार आहे. त्यामुळे शरद पवारांचे हे शेवटचे हिवाळी अधिवेशन ठरण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार अशी चर्चा सुरू आहे. कोणत्या ना कोणत्या निमित्ताने शरद पवार आणि अजित पवार यांची सातत्याने भेट होताना दिसतेय. त्याचवेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादींनी युती केल्याचं दिसून आलं आहे.
