गौतम अदानी 10 वर्षांतच कसे मोठे होतात? राज ठाकरेंनी गौडबंगाल सांगितलं…

उद्योजक गौतम अदानी 10 वर्षांतच कसे मोठे होतात? असा खडा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकर यांनी करीत अदानींचं गौडबंगालच सांगितलयं.

Untitle (3)

Raj Thackeray : उद्योजक गौतम अदानी 10 वर्षांतच कसे मोठे होतात? असा खडा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray ) यांनी केला आहे. दरम्यान, महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आज राज ठाकरे पुणे दौऱ्यावर होते. मुंबईत पार पडलेल्या जाहीर सभेतून राज ठाकरे यांनी उद्योजक गौतम अदानी यांच्या व्यवसायाची माहिती मॅपद्वारे देऊन सडकून टीका केली होता. त्यानंतर आज पुणे दौऱ्यावर असताना पुन्हा एकदा राज ठाकरेंनी अदानींच्या मुद्द्यावरुन सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणत फडणवीसांचं ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर, मुंबईत आरोप-प्रत्यारोपांचा जलसा…

पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, केंद्र सरकारने उभे केलेले 7 ते 8 विमानतळं गौतमी अदानींना दिलेले आहेत. त्यातील एकही विमानतळ अदानींनी बांधलेलं नाही. गौतम अदानींनी केवळ नवी मुंबईचं विमानतळ बांधलं आहे. उद्योगाला माझा कधीही विरोध नाही. गौतम अदानी सिमेंटच्या व्यवसायात भारतात दोन नंबरला आहेत. ज्या सिमेंटच्या व्यवसायात अदानी कधीच नव्हते, त्यांनी अल्ट्राटेकसारख्या कंपन्या विकत घेतल्या आहेत. त्यानंतर ते आता दोन नंबरला आहेत. अदानींना नेमंक कोणत्या बॅंका आणि संस्थांना सरकारने अर्थसहाय्य करायला लावलं, असा थेट सवाल राज ठाकरे यांनी यावेळी केलायं.

माझ्या उमेदवारांना 15 कोटींची ऑफर; ठाण्यातील सभेत राज ठाकरेंचा भाजपवर थेट प्रहार

तसेच उद्या हा एकच माणूस देशाला वेठीस धरु शकतो, याचं उत्तम उदाहरण जे या देशात इंडिगोने केलं . सर्व विमानतळे बंद झाली. एका एअरलाईनने व्यवसाय बंद केल्यानंतर काय हाल होतात हे देशाने पाहिलंय. उद्या सर्व गोष्टी कोलॅब्स झाल्या तर नोकऱ्या जातील, देश बरबाद होईल हा देश एक दिवस ठप्प होईल. हेच टूल वापरुन महाराष्ट्रातील शहरं तुम्ही काबिज करायला जाता तेव्हा हा धोका महाराष्ट्रासाठी मोठा असल्याचंही राज ठाकरे यांनी स्पष्ट केलंय.

इराणमध्ये जनतेचा तीव्र आक्रोश; हिंसक आंदोलनात झालेल्या गोळीबारात तब्बल 538 आंदोलकांचा मृत्यू

दरम्यान, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू यांनी मुंबईत घेतलेल्या जाहीर सभेत गौतम अदानी यांच्यावर सडकून टीका केलीयं. या टीकेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही काल सभा घेत जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

follow us