‘गांढूळ नाही, हे मोदींसमोर वळवळ करणारे मांढूळ’, ठाकरेंचा पुन्हा शिंदेंवर घणाघात
Uddhav Thackeray On Eknath Shinde : आज शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ठाण्यात पक्षाचा मेळावा घेतला.
Uddhav Thackeray On Eknath Shinde : आज शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ठाण्यात पक्षाचा मेळावा घेतला. या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. या मेळाव्यात बोलताना जर ठाण्यात शिवसैनिकांनी ठाण्यात मेहनत घेतली नसती तर मिंधेंची दाढी उगवली झाली नसती अशी टीका उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली.
या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, दुबार मतदान नोंदणीचा मुद्दा चांगला आहे, कलेक्टरने सांगू काही केलं नाही मात्र आता तीन महिने थांबा सरकारी कलेक्टर आणि मिंध्याचे कलेक्टर कुठे पाठवतो ते बघा चांडाळ चौकडी आहे. त्यांना तुरुंगाचे गज मोजायला लावणार असं देखील यावेळी ठाकरे म्हणाले.
पुढे बोलताना ठाकरे म्हणाले की, आम्हाला नमक हराम टूची उत्सुकता आहे. मी नागांचा अपमान करू शकत नाही. हे मांडूळ आहेत, गांढूळ नाही, हे दुतोंडी आहे. यांना फणा नाही. हे मोदींसमोर वळवळ करणारे मांढूळ आहे. हे लोटांगण घालतात. पँट तिकडे जाऊन खराब होत नाही. फोन आल्यावरच खराब होते. जसे असाल तसे या. फोन येताच पाळतात. नशिब तेव्हा पँट घातलेली असते.अशी देखील टीका यावेळी ठाकरे यांनी केली.
अमित शाहांना इशारा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी अमित शाह यांच्यावर टीका करत महाराष्ट्राचा पाणी काय असतो हे तुम्हाला दाखवून देणार असं उद्धव ठाकरे म्हणाले.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, आपल्यामध्ये फूट पाडण्याचे हे अब्दालीचे चाळे आहे. अहमद शाह अहमदाबाद शाह नाही अहमद शाह. सगळ्या गुजरातच्या लोकांबद्दल माझा राग नाही पण जे माझ्या महाराष्ट्राला लुटताय त्या दरोडेखोरांबद्दल माझा राग आहेच आणि त्यांना गाडायचं म्हणजे गाडायचं. कोणत्याही परिस्थितीमध्ये गाडायचं असं उद्धव ठाकरे म्हणाले. लेना ना देना आता पुन्हा 16 ऑगस्टला येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजानंतर औरंगजेब जेव्हा महाराष्ट्रात चालून आला तेव्हा त्याच्या घोड्याला सुद्धा पाणी पिताना पाण्यामध्ये संतांची धनाजी दिसायची तसेच या अब्दालीच्या खेचरांना पाण्यात उद्धव ठाकरे दिसतो. पण तुम्ही आता महाराष्ट्राचे पाणी झोपलेलं नाही.
महाराष्ट्राने तुम्हाला आतापर्यंत पाणी पाजलेला नाही. हा सामना होऊ द्या, महाराष्ट्राचा पाणी काय असतो हे तुम्हाला दाखवून देणार असा इशारा देखील यावेळी ठाकरे यांनी गृहमंत्री अमित शाह यांना दिला.
