‘महाराष्ट्राचा पाणी काय असतो हे तुम्हाला दाखवून देणार’, शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंचा शाहांना इशारा

‘महाराष्ट्राचा पाणी काय असतो हे तुम्हाला दाखवून देणार’, शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंचा शाहांना इशारा

Uddhav Thackeray : येत्या काही दिवसात राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे. त्यापूर्वी प्रत्येक राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरु झाली आहे. यातच आज राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बालेकिल्ल्यात भव्य मेळावा आयोजित केला होता.

या मेळाव्यात त्यांनी पुन्हा एकदा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि महायुतीच्या (Mahayuti) नेत्यांवर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्राचा पाणी काय असतो हे तुम्हाला दाखवून देणार असा इशारा उद्धव ठाकरे यांनी या मेळाव्यात बोलताना गृहमंत्री अमित शाह यांना दिला.

या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, नुसत्या घोषणा देऊन निवडणुका जिंकता येत नाही. मिंधे सरकार आज फक्त घोषणांचा पाऊस करत आहे आणि अंमलबजावणीचा दुष्काळ त्यामुळे आपल्याला फक्त घोषणा नाही द्याचे. लोकसभा निवडणुकीत माझ्या कार्यकर्त्यांला पराभव करण्यासाठी मिंधेंना विश्वगुरूला आणावा लागला. हा आपला विजय आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले. तर पुढे बोलताना उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, आपल्यामध्ये फूट पाडण्याचे हे अब्दालीचे चाळे आहे. अहमद शाह अहमदाबाद शाह नाही अहमद शाह. सगळ्या गुजरातच्या लोकांबद्दल माझा राग नाही पण जे माझ्या महाराष्ट्राला लुटताय त्या दरोडेखोरांबद्दल माझा राग आहेच आणि त्यांना गाडायचं म्हणजे गाडायचं. कोणत्याही परिस्थितीमध्ये गाडायचं असं उद्धव ठाकरे म्हणाले. लेना ना देना आता पुन्हा 16 ऑगस्टला येत आहे.

छत्रपती शिवाजी महाराजानंतर औरंगजेब जेव्हा महाराष्ट्रात चालून आला तेव्हा त्याच्या घोड्याला सुद्धा पाणी पिताना पाण्यामध्ये संतांची धनाजी दिसायची तसेच या अब्दालीच्या खेचरांना पाण्यात उद्धव ठाकरे दिसतो. पण तुम्ही आता महाराष्ट्राचे पाणी झोपलेलं नाही.

मातोश्रीबाहेर मुस्लिम समाज आक्रमक, ठाकरेंविरोधात घोषणाबाजी, नेमकं घडलं काय?

महाराष्ट्राने तुम्हाला आतापर्यंत पाणी पाजलेला नाही. हा सामना होऊ द्या, महाराष्ट्राचा पाणी काय असतो हे तुम्हाला दाखवून देणार असा इशारा देखील यावेळी ठाकरे यांनी गृहमंत्री अमित शाह यांना दिला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube