अब्दालीचा वंशज इथे येऊन बोंबलून गेला, उद्धव ठाकरेंची भाजपा नेते अमित शाहंवर घणाघाती टीका
Uddhav Thackeray on BJP : शाहिस्तेखान हुशार होता. त्याचं बोटावर निभावलं. पुन्हा महाराष्ट्रात आला नाही. हे परत आले. त्यांनी शहाणपण घेतलं नाही. महाराष्ट्राने जे फटके दिले त्याचे वळ कुठं कुठं उठले ते पाहण्यासाठी आले होते. अहमद शहा अब्दालीचा राजकीय वंशज अमित शाह आला होता. तोही शाहच होता. तो अहमद शाह होता हा अमित शाह आहे. असा थेट घणागात (Uddhav Thackeray) उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला आहे. पुण्यात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून शिवसंकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यापासून संजय राऊत आणि पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनीही भाजप नेत्यांवर जोरदार प्रहार केलाय.
कुछ कुत्ते हमारे उपर भौंकते हैं, हम मैदान में आ कर ठोकते है; संजय राऊतांची भाजपवर जहरी टीका
आम्हाला हिंदुत्व शिकवता. तुम्ही नवाज शरीफची केक खाणारी औलाद तुमच्याकडून आम्ही हिंदुत्व शिकायचं असा थेट प्रश्न करत उद्धव ठाकरेंनी चांगलेच फटकारे ओडलेत. तसंच, तुम्ही विश्वासघात केला. विश्वासघात करणारा हिंदू असू शकत नाही, असं शंकराचार्य म्हणाले. तुम्ही काय करता? तुमचे पूर्वज काढा, 1940 पासून. श्यामाप्रसाद मुखर्जी, तेव्हाच्या मुस्लिम लीगने देशाची फाळणी मागितली. त्यांच्यासोबत मांडीला मांडू लावून बंगालमध्ये सत्ता स्थापन करणारे यांचे राजकीय बाप श्यामाप्रसाद मुखर्जी. मेहबुबा मुफ्ती यांच्यासोबत भाजपने सरकार केलं. चंद्राबाबू नायडू हा काय हिंदुत्ववादी माणूस आहे,. नितीश कुमार हा काय हिंदुत्ववादी आहे. त्यांच्याकडे डोळेझाक केली जाते. आणि आम्हाला हिंदुत्वाचं विचारता. तुमचं काय आहात ते सांगा? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी भाजपाला विचारला आहे.
आपल्याला जिकण्याची सवय आहेच; मात्र, शिवसेनेतून फुटलेले गद्दार गाडून निवडून यायचय -अंबादास दानवे
गडकरी म्हणत होते असे रस्ते बांधीन की दोनशे वर्ष खड्डाच पडणार नाही. मुंबई गोवा मार्ग बघा. सगळीकडे खड्डे आहेत. सगळीकडे खड्डेच खड्डे आहेत. त्याचे फोटो काढा आणि त्यांना खड्डा पुरुष पुरस्कार द्या, टरबूज जाऊ द्या हो. त्याला खड्ड्यात घाला अशी मिश्कील टिप्पणीही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली आहे. दरम्यान, संसद गळत आहे, ज्याने संसद बांधली. तोच या नदीवर काम करत आहे. कंत्राटदार माझा लाडका सुरू आहे. तोही गुजरातचा आहे. वर्षही झालं नाही संसद बांधून. ती गळायला लागली. मोदी काँग्रेसकडे 70 वर्षांचा हिशोब मागत आहेत. 70 वर्षात काय केलं. तुमने क्या किया विचारत आहात. ते काय विचारता. तुम्ही 12 महिन्यापूर्वी बांधललेली संसद गळत आहे. राम मंदिर गळत आहे. पेपर लिक होत आहे. त्याचा हिशोब द्या. मग काँग्रेसला विचारा. हे गळती सरकार आहे. आम्ही यांना पाठिंबा दिला होता. हे आमचं पाप होतं असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.