Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे हे काय बोलले?; भाजप ‘आरएसएस’वरही बंदी आणेल

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे हे काय बोलले?; भाजप ‘आरएसएस’वरही बंदी आणेल

Uddhav Thackeray on RSS : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान २० मे रोजी होत आहे. या मतदानाच्या दोन दिवस आधीच इंडिया आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद आज मुंबईत आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप आणि आरएसएसवर घणाघाती टीका केली. उद्या ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही नकली म्हणतील मला वाटतं की आता आरएसएसलाही धोका आहे. भाजप आरएसएसवरही बंदी आणेल, असे वक्तव्य करत उद्धव ठाकरेंनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यावर जोरदार पलटवार केला.

https://x.com/ANI/status/1791700584808288508

भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी नुकतच एक वक्तव्य केलं आहे ज्याची जोरदार चर्चा सुरू आहे. आम्ही आधीपेक्षा जास्त सक्षम झालो असून स्वतःच स्वतःचा पक्ष चालवू  शकतो असे नड्डा म्हणाले होते.  त्यांच्या याच वक्तव्यावर आज पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी जोरदार पलटवार केला. उद्धव ठाकरे म्हणाले, भाजपाच्या मनात पाकिस्तान आहे. त्यांना अजूनही नवाज शरीफ यांचा केक आठवत आहे. फक्त निवडणुका जिंकण्यासाठीच पुलवामा हल्ला घडवून आणला का असा सवाल उद्धव ठाकरेंनी भाजपला विचारला.

उद्धव ठाकरेंचा मोदींवर निशाणा, म्हणाले, महाराष्ट्र्र तुम्हाला गाडल्याशिवाय राहणार नाही…

मला वाटतंय की आता आरएसएसलाच धोका निर्माण झाला आहे. कारण उद्या ते आरएसएसवरच बंदी आणतील. ते जर म्हणतात की काँग्रेस राम मंदिरावर बुलडोजर चालवील तर मी म्हणतो की भाजप आरएसएसवर बंदी आणेल, अशी खरमरीत टीका उद्धव ठाकरे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात भारतीय जनता पार्टीवर केली. यानंतर त्यांनी विविध मुद्द्यांवर भाजपला घेरले.

काल मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत महायुतीची सभा झाली. या सभेत मोदींनी उद्धव ठाकरेंचा नकली संतान असा उल्लेख केला. त्यांच्या या टीकेवरही ठाकरेंनी उत्तर दिलं. आता फक्त आरएसएसला नकली म्हणणं बाकी राहिलं आहे. भाजप उद्या संघावरही बंदी आणेल. मोदींनी मला सुद्धा नकली संतान म्हटलं आहे. कालच्या सभेत जे लोक आले होते त्यांनी आपली दिशा ठरवावी असे उद्धव ठाकरे म्हणाले.

लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातले दोन पक्ष लोप पावतील…; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा

मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार : खर्गे

महाराष्ट्रातच नाही तर मणिपूर, गोवा, कर्नाटक, मध्य प्रदेश या राज्यात भाजपने फोडाफोडी करत सरकार स्थापन केले. त्याविरोधात आमची लढाई सुरुच आहे. राज्यात मविओ बळकट आहे. आम्ही महाराष्ट्रात किमान ४६ जागा जिंकू अशी परिस्थिती आहे. त्यांना काहीच जागा मिळणार नाहीत असं मी म्हणत नाही. त्यांनाही काही ना काही मिळेल पण महाविकास आघाडी जास्तीत जास्त जागा जिंकेल असा विश्वास काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी व्यक्त केला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज