उद्धव ठाकरेंचा मोदींवर निशाणा, म्हणाले, महाराष्ट्र्र तुम्हाला गाडल्याशिवाय राहणार नाही…

उद्धव ठाकरेंचा मोदींवर निशाणा, म्हणाले, महाराष्ट्र्र तुम्हाला गाडल्याशिवाय राहणार नाही…

Uddhav Thackeray On Narendra Modi : महाविकास आघाडीच्या (MVA) उमेदवारांसाठी आज मुंबईतील बीकेसी मैदानात उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) जाहीर सभा घेतली. यावेळी शरद पवार (Sharad Pawar) , दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) , काँग्रेस अध्यक्ष खरगे (Mallikarjun Kharge) देखील उपस्थित होते. या जाहीर सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीसह (Narendra Modi) महायुतीच्या नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला.

या सभेत बोलताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, मोदींनी आपल्या फसवलं, त्यांनी नोटबंदी केली त्याला डिमॉनिटाजेशन म्हणतात. तसंच मोदीजी तुम्ही आज शेवटचे मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणून आलो आहोत, आज तुम्ही बोलून घ्या कारण चार जूनला संपूर्ण देश तुम्हाला डीमोदीनेशन करणार असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.

डिमॉनिटाजेशननंतर जशा चलनी नोटा फक्त कागदाचे तुकडे राहिले होते, तसंच चार जूननंतर तुम्ही फक्त नरेंद्र मोदी राहाल तुम्ही देशाचे पंतप्रधान राहणार नाही असा टोला देखील त्यांनी यावेळी नरेंद्र मोदींनी लावला आहे.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, आज मुंबईत दोन सभा होत आहे, एका बाजूला आपण सगळे आहे तर दुसऱ्या बाजूला सर्व गद्दार, भाडोत्री बेअकली आणि नकली जमले आहे. जे सडलेली पाने आमच्याकडे होती ती आता तुमच्याकडे आली आहेत.

‘बाळासाहेबांचे विचार नाही, धनुष्यबाण नाही, आमच्याकडे शिवसेना तर तुमच्याकडे शिव्या सेना’, ठाकरेंवर शिंदेंचा घणाघात

आमच्याकडील उरलेला सर्व कचरा तुम्ही एकत्र जमवला आहे. अशी घणाघात टीका त्यांनी नरेंद्र मोदींसह एकनाथ शिंदेंवर केली. तर हे लक्षात ठेवा उद्धव ठाकरेंना संपविण्याचा प्रयत्न करणाऱ्याला महाराष्ट्र्र गाडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज