‘मोदीजी हिम्मत असेल तर डोळ्यात डोळे घालून निवडणूक लढा’,केजरीवाल यांचा मोदींवर निशाणा

‘मोदीजी हिम्मत असेल तर डोळ्यात डोळे घालून निवडणूक लढा’,केजरीवाल यांचा मोदींवर निशाणा

Arvind Kejriwal On Narendra Modi : महाविकास आघाडीचे (MVA) उमेदवार सुरेश म्हात्रे ऊर्फ बाळ्या मामा (Suresh Mhatre) यांच्या प्रचारार्थ आज शरद पवारांनी (Sharad Pawar) भिंवडी येथे जाहीर सभा घेतली आहे. या जाहीर सभेत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) जोरदार हल्लाबोल करत तुमच्यात हिम्मत असेल तर तुम्ही डोळ्यात डोळे घालून निवडणूक लढा असा इशारा दिला आहे.

या सभेत बोलताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले, पाकिस्तान आणि बांगलादेशप्रमाणे आज पंतप्रधान मोदीजी विरोधकांना तुरुंगात टाकत आहे आणि निवडणूक लढवत आहे. यापूर्वी देशातील परिस्थिती अशी कधीच नव्हती असा आरोप यावेळी केजरीवाल यांनी केला.

केजरीवाल म्हणाले, जसे रशियात पुतिन सर्व विरोधकांना कारागृहात टाकतात, अथवा त्यांना मरून टाकतात आणि निवडणुक घेतात आणि 87 टक्के मते मिळवतात असं आता देशात होत आहे. मोदींनी मला तुरुंगात टाकले आणि म्हणत आहे दिल्लीमध्ये आम्ही जिंकणार आहे. त्यांनी शिवसेना फोडली, राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक मंत्री तुरुंगात टाकले. मोदीजी जर तुमच्यात हिम्मत असेल तर तुम्ही डोळ्यात डोळे घालून निवडणूक लढा असा  अशी टीका त्यांनी नरेंद्र मोदींवर केली.

पुढे केजरीवाल म्हणाले, 2014 मध्ये भाजपसाठी मोदींनी एक नियम बनवला होता, जो 75 वयापेक्षा जास्त असेल त्यांना राजकारणातून निवृत्ती घ्यावी लागेल. मोदीजी पुढील वर्षी 75 वर्षाचे होणार आहे यामुळे ते अमित शाह यांना पंतप्रधान करणार आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये अमानवीय घटना, चारित्र्यावर संशय असल्याने पतीने पत्नीच्या गुप्तांगाला होल पाडून कुलूप बसवले

यावेळी मोदीजी स्वतःसाठी नाहीतर अमित शाह यांच्यासाठी मत मागत आहे यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी विचार करून मत द्यावा असा आवाहन त्यांनी यावेळी केला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज