‘बाळासाहेबांचे विचार नाही, धनुष्यबाण नाही, आमच्याकडे शिवसेना तर तुमच्याकडे शिव्या सेना’, ठाकरेंवर शिंदेंचा घणाघात
Eknath Shinde On Uddhav Thackeray : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पाचव्या टप्प्यातील प्रचारासाठी आता काही तास उरले आहे. यामुळे राज्यात महायुतीच्या (Mahayuti) नेत्यांकडून जोरदार प्रचार होताना दिसत आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Modi) महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मुबईमध्ये जाहीर सभा घेतली. या जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) देखील उपस्थित होते.
या सभेत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, आज उबाठाला हिंदू म्हणून घ्याची लाज वाटत आहे. ही लाचारी मतासाठी आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) नरेंद्र मोदींचा कौतुक करत होते मात्र आज त्यांच्यावरच टीका करत आहे. आपण रंग बदलणारे सरडे पाहिले आहे मात्र इतक्या जलद गतीने रंग बदलणारा सरडा कोणी पाहिला नाही असा टोला एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लावला.
काँग्रेस , फारुख अब्दुल्ला, लालूप्रसाद यादव यांच्यावर बाळासाहेबांनी ठाकरे शैलीत टीका केली होती मात्र आज उबाठा त्यांच्या मांडीला मांडी लावून बसत आहे. बाळासाहेब म्हणत होते काँग्रेसचा गवत उपटून टाका पण आज उबाठा त्याच गवतावर लोळत आहे.
पुढे एकनाथ शिंदे म्हणाले, बिघडलेलं पोरगं चुकीच्या वाटेला लागलं आणि आज सर्वांना म्हणत आहे माझा बाप चोरला, अरे हे खेळ नाही. आज आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जात आहे. बाळासाहेबांची संपत्ती तुमची आहे. आम्हाला त्यांची संपत्ती नको, त्यांचे विचारचं आमची संपत्ती आहे असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
आज बाळासाहेंबाचा फोटो आणि त्याच्या खाली काँग्रेसच्या हाताचा पंजा आहे मात्र 6 वर्ष बाळासाहेबांचा मताचा अधिकार काँग्रेसने हिसकावून घेतला होता मात्र आज माझा मत काँग्रेसला असा अभिमानाने उबाठा म्हणत आहे .
2019 मध्ये भाजप आणि शिवसेना युती म्हणून तुम्ही निवडणूक लढवली मात्र तुम्ही सरकार काँग्रेससोबत स्थापन केली तेव्हाच तुम्ही बाळासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार सोडला असा टोला देखील त्यांनी यावेळी उद्धव ठाकरेंना लावला.
‘मोदीजी हिम्मत असेल तर डोळ्यात डोळे घालून निवडणूक लढा’ केजरीवाल यांचा मोदींवर निशाणा
काही दिवसापूर्वी मोदी म्हणाले होते, नकली शिवसेना. बरोबर आहे. तुमच्याकडे शिवसेनेचे विचार नाही. बाळासाहेबांचे विचार नाही. शिवसेना नाही, धनुष्यबाण नाही. आमच्याकडे शिवसेना आहे. तुमच्याकडे शिव्या सेना आहे. रोज शिव्या देणं एवढंच काम असल्याचं म्हणत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.