भाजप कागदावर पण, मित्रपक्षाचा अ‍ॅक्शन मोड; पराभवानंतर दोन राज्यातील कार्यकारिणीच बरखास्त

भाजप कागदावर पण, मित्रपक्षाचा अ‍ॅक्शन मोड; पराभवानंतर दोन राज्यातील कार्यकारिणीच बरखास्त

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा धक्का (Lok Sabha Election 2024) बसला. उत्तर प्रदेशसह महाराष्ट्र, हरयाणा, कर्नाटक, पश्चिम बंगाल या राज्यात पिछेहाट झाली. फक्त भाजपचं नाही तर मित्र पक्षांनाही फटका बसला. आता या पराभवाची कारणं शोधली जात आहेत. उत्तर प्रदेशसह अन्य राज्यात भाजपने यासाठी काम सुरू केले आहे. नेतेमंडळी पराभव का झाला याची माहिती घेतील, चर्चा करतील नंतर अहवाल तयार करून पक्षश्रेष्ठींना सादरही करतील. यासाठी बराच वेळ लागणार आहे. पण दुसरीकडे उत्तर प्रदेशातील भाजपाच्याच मित्र पक्ष अपना दलाने तर थेट कारवाईलाच सुरुवात केली आहे.

अपना दलाने उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील पक्षाच्या सर्व कार्यकारिणी तत्काळ प्रभावाने बरखास्त केल्या आहेत. पक्षाच्या अध्यक्षा अनुप्रिया पटेल यांच्या (Anupriya Patel) आदेशानुसार प्रदेश, क्षेत्रीय, जिल्हा आणि विधानसभा पातळीवरील सर्व कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्या आहेत. पक्षाचे राष्ट्रीय सचिव मुन्नर प्रजापती यांनी सांगितले की आता नव्याने कार्यकारिणी गठित केल्या जाणार आहेत.

Lok Sabha 2024 : इलेक्शनमध्ये ट्विस्ट, भाजपला धक्का; यंदा 208 मतदारसंघात पक्षच बदलला

लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात अपना दलाचे उमेदवार दोन पैकी एका जागेवर पराभूत झाले. रॉबर्ट्सगंज मतदारसंघ गमवावा लागला. मिर्झापूर मतदारसंघातून पक्षाच्या अध्यक्षा अनुप्रिया पटेल विजयी तर झाल्या पण त्यांचं मताधिक्य मोठ्या प्रमाणात घटलं. त्यामुळे पुढील धोका ओळखून पक्षातील नेते आधीच सावध झाले आहेत. सर्वात आधी कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्या आहेत. स्थानिक पातळीवर कार्यकारिणी महत्वाची भूमिका बजावतात. यावेळी पक्षाची झालेली अवस्था पाहता या कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या नाहीत असे या कारवाईवरुन दिसून येत आहे.

माजी खासदाराला कारणे दाखवा नोटीस

ऐन निवडणुकीच्या काळात विश्वासघात करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. पार्टीने रॉबर्ट्सगंज येथील माजी खासदार पकौडी लाल कोल यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. कोल यांनी त्यांच्या सून रिंकी कोल यांनी उमेदवारी देण्यास विरोध केला होता. तरीदेखील पक्षाने त्यांना तिकीट दिले. यामुळे पकौडी लाल कोल यांनी निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार केला नाही. त्यामुळे रिंकी कोल यांचा पराभव झाला. यानंतर पक्षाने पकौडी लाल कोल यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटीसीचे उत्तर मिळाल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

Uttar Pradesh Loksabha Election Result : भाजपला धक्काच! उत्तर प्रदेशात ‘सायकल’ सुसाट पळाली..

follow us
  • fb
  • instagram
  • youtube