Lok Sabha 2024 : इलेक्शनमध्ये ट्विस्ट, भाजपला धक्का; यंदा 208 मतदारसंघात पक्षच बदलला

Lok Sabha 2024 : इलेक्शनमध्ये ट्विस्ट, भाजपला धक्का; यंदा 208 मतदारसंघात पक्षच बदलला

Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकांचे निकाल समोर आल्यानंतर सर्वाधिक झटका (Lok Sabha Election 2024) भाजपला बसला. बहुमत तर दूरच अडीचशेचा टप्पा गाठणेही भाजपला शक्य झाले नाही. राजस्थान, कर्नाटक, महाराष्ट्र, बिहार, हरयाणा या राज्यांत जागा कमी झाल्या. पण या सर्वात उत्तर प्रदेशाने भाजपला सर्वाधिक झटका दिला. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे चारशे पारचे स्वप्न भंगले. बहुमत न मिळाल्याने देशात पुन्हा आघाडी सरकारचे युग अवतरले आहे. मागील दोन निवडणुका मध्ये स्पष्ट बहुमत मिळाल्याने भाजप सरकारने अनेक धाडसी निर्णय घेतले. आता मात्र तशी परिस्थिती राहिलेली नाही. मित्र पक्षांना सोबत घेत ते नाराज होणार नाहीत याची काळजी घेत भाजपला देशाचा कारभार करावा लागणार आहे.

यंदाच्या निवडणुकीचा एक वैशिष्ट्य राहिलं ते म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या ताब्यात असलेल्या 208 जागा विरोधकांनी काबीज केल्या. 2019 मध्ये अशा जागांची संख्या 178 होती. 2024 मधील निवडणुकीत 41 जागा अशा होत्या ज्या आधी भाजपच्या ताब्यात होत्या त्या आता काँग्रेसच्या ताब्यात गेल्या. तसेच 47 जागा इंडिया आघाडीतील अन्य पक्षांच्या ताब्यात गेल्या. तर 9 जागा काँग्रेसच्या ताब्यातून भाजपने खेचून आणल्या. भारतीय जनता पार्टीच्या ताब्यातील 88 जागा इंडिया आघाडीतील काँग्रेस आणि अन्य पक्षांच्या खात्यात गेल्या.

एकनाथ शिंदेंसाठी अच्छे दिन! मोदींच्या मंत्रिमंडळात ‘इतक्या’ खासदारांना मिळणार मंत्रिपद

आंध्र प्रदेश, ओडिशा, बिहार, तेलंगणा आणि महाराष्ट्रातील काही जागा एनडीएच्या खात्यात आल्या तर उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, तामिळनाडू, कर्नाटक, पश्चिम बंगाल, तेलंगणा आणि बिहार राज्यांतील जागा इंडिया आघाडीच्या खात्यात आल्या.

इंडिया आघाडीतील काही मतदारसंघ भाजपने जिंकून घेतले. यामध्ये आंध्र प्रदेश 16, ओडिशा 11, बिहार 8, तेलंगणा 8 आणि महाराष्ट्रातील पाच मतदारसंघांचा समावेश आहे. याचा पद्धतीने एनडीए आघाडीतील काही मतदारसंघ इंडिया आघाडीने जिंकले आहेत. यामध्ये उत्तर प्रदेश 37, महाराष्ट्र 23, राजस्थान 10, तेलंगणा 8, कर्नाटक 9, पश्चिम बंगाल 9, तामिळनाडू 10 आणि बिहारमधील 8 मतदारसंघांचा समावेश आहे.

यावेळच्या निवडणुकीत मध्य प्रदेशातील इंदोर मतदारसंघात भाजपच्या शंकर लालवाणी 11 लाखांपेक्षा जास्त मतांनी जिंकले. देशातील सर्वात जास्त मताधिक्याने जिंकलेला हा मतदारसंघ ठरला आहे. तसेच मुंबई नॉर्थ वेस्ट मतदारसंघात सर्वात कमी मताधिक्याने म्हणजेच फक्त 48 मतांनी शिंदे गटाचे रवींद्र वायकर यांनी ठाकरे गटाचे अमोल किर्तीकर यांचा पराभव केला.

यंदाच्या निवडणुकीत भाजपच्या काही जागा कमी झाल्या त्यामुळे सरकार स्थापन करण्यात अडचणी येत आहेत. मात्र भाजपच्या मतांच्या टक्केवारीत फारशी घट झालेली नाही. हे एक जमेची बाजू म्हणता येईल. काँग्रेसची मात्र दोन टक्क्यांनी मते वाढली. भाजपला सर्वाधिक नुकसान हरयाणा आणि राजस्थान मध्ये झाले. राजस्थानात भाजपाचा व्होट शेअर 58.5 टक्क्यांवरून 49.2 टक्क्यांवर आला. तसेच हरियाणात सुद्धा भाजपाचा व्होट शेअर 58 टक्क्यांवरून 46.1 टक्क्यांपर्यंत खाली आला.

हार्दिक, बुमराह चमकले, भारतीय गोलंदाजांचा कहर, आयर्लंडने दिले 97 धावांचं टार्गेट

इंडिया आघाडीत सहभागी असलेल्या द्रमुक पक्षाचा स्ट्राइक रेट शंभर टक्के राहिला. मागील निवडणुकीत जिंकलेल्या सर्व जागा या निवडणुकीत पुन्हा जिंकल्या आहेत. आंध्र प्रदेशातील तेलुगू देसम पक्षाने 94.1 टक्के जागा पुन्हा मिळवल्या आहेत. तृणमूल काँग्रेसने 61.7 टक्के तर समाजवादी पार्टीने 52.1 जागा पुन्हा मिळवल्या आहेत.

महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्यानंतरच्या या पहिल्या लोकसभा निवडणुका होत्या. यंदा देशभरातून 75 महिला उमेदवार निवडून आल्या आहेत. यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सर्वाधिक 32 महिला खासदार आहेत. 155 मतदारसंघात एकही महिला उमेदवार नव्हती. सन 1951 मधील पहिल्या लोकसभा निवडणुकीत फक्त 22 महिला उमेदवार निवडून आल्या होत्या. 2004 मध्ये 45, 2009 मध्ये 59, 2014 मध्ये 66, 2019 मध्ये 78 आणि 2024 च्या निवडणुकीत 75 महिला उमेदवार निवडून आल्या आहेत.

इंडिया आघाडी विरोधात बसणार, सत्ता स्थापनेचा दावा करणार नाही; सूत्रांची माहिती

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज