हार्दिक, बुमराह चमकले, भारतीय गोलंदाजांचा कहर, आयर्लंडने दिले 97 धावांचं टार्गेट

हार्दिक, बुमराह चमकले, भारतीय गोलंदाजांचा कहर, आयर्लंडने दिले 97 धावांचं टार्गेट

T20 World Cup 2024 IND vs IRE Live Score : T20 विश्वचषक 2024 मध्ये (T20 World Cup 2024) आज भारत विरुद्ध आयर्लंड (IND vs IRE) सामना खेळाला जात आहे. न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी कहर केला आहे.

भारतीय गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत आयर्लंडला अवघ्या 96 धावांत ऑल आऊट केला आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडची सुरुवात खराब झाली आणि संघाला सावरता आले नाही.

सलामीवीर अँड्र्यू बालबर्नीने 5 धावा केल्या आणि कर्णधार पॉल स्टर्लिंगने 2 धावा केल्या. जॉर्ज डॉकरेल (3) , मार्क एडेअर (3) , जॉर्ज डॉकरेल (3) तर कर्टिस कॅम्फरने 12 आणि लॉर्कन टकरने 10 धावांचे योगदान दिले. बॅरी मॅकार्थीचे खाते उघडलेले नाही. तर आयर्लंडकडून गॅरेथ डेलेनीने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 14 चेंडूत 26 धावा केल्या, ज्यात 2 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश आहे.

भारताकडून हार्दिक पांड्याने सर्वाधिक तीन बळी घेतले. अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी दोन बळी घेतले. मोहम्मद सिराज आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

देशात पुन्हा मोदी सरकार! चंद्राबाबू नायडू – नितीश कुमारकडून समर्थन, ‘या’ दिवशी होणार शपथविधी

तर या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहली भारतीय डावाची सुरुवात करणार आहे. विराट कोहलीने यापूर्वी आयपीएलमध्ये सलामीवीर फलंदाज म्हणून चमकदार कामगिरी केली आहे. यामुळे या सामन्यात तो कशी कामगिरी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज