IND vs IRE : संजू, रिंकूचे वादळ, आयर्लंडच्या गोलंदाजांना धू-धू धुतले

IND vs IRE : संजू, रिंकूचे वादळ, आयर्लंडच्या गोलंदाजांना धू-धू धुतले

IND vs IRE : टीम इंडिया (IND) विरुध्द आयर्लंडचा मालिकेचा दुसरा सामना सुरू आहे. या दुसऱ्या सामन्यात भारताने  प्रथम फलंदाजी करत आयर्लंडसमोर विजयासाठी 186 धावांचे आव्हान ठेवले आहे.

सलामवीर आणि उपकप्तान ऋतुरारज गायकवाड याने 58 धावांची खेळी खेळली. संजू सॅमसनने 26 चेंडूत 40 धावा केल्या. संजू आणि ऋतु यांच्यातील 71 धावांच्या भागीदारीनंतर रिंकू सिंगने आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय डावात शानदार फलंदाजी केली. त्याने स्लॉग ओव्हरमध्ये 21 चेंडूत 38 धावा करत भारताला 180 पर्यंत नेले. त्याने 180 च्या स्ट्राईक रेटने आपल्या डावात 3 षटकार आणि 2 चौकार मारले. त्याला शिवम दुबेने 16 चेंडूत 22 धावा करत चांगली साथ दिली.

शिक्षक बँकेची सभा बनली आखाडा; गुरुजी थेट एकमेकांच्या अंगावरच धावले 

आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला. सलामीवीर यशस्वी जयस्वालने नेहमीप्रमाणे आक्रमक सुरुवात करून देण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे ऋतुराज गायकवाडने त्यांला चांगली साथ दिली. पण पॉवर प्लेमध्ये क्रेग यंगने यशस्वीला 18 धावांवर बाद केले. यानंतर आलेला टिळक वर्माही 2 चेंडू खेळून परतला. त्याला बॅरी मॅककार्थीने बाद केलं. पाठोपाठ 2 विकेट पडल्यानंतर आलेल्या संजू सॅमसन आणि उपकर्णधार ऋतुराज गायकवाड यांनी भारताचा डाव सावरला.

या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 71 धावांची भागीदारी रचली. यासह 12व्या षटकातच भारताचे शतक धावफलकावर लागले. या भागीदारीत आक्रमक फलंदाजीची जबाबदारी संजू सॅमसन निभावत होता. तर ऋतुराज हा अँकर इनिंग खेळत होता. तेव्हा बेंजामिन व्हाइटने 26 चेंडूंत 40 धावा करणाऱ्या संजूचा त्रिफळा उडवला. संजू आऊट झाल्यावर ऋतुराजने खेळाची सगळी सूत्रे आपल्या हातात घेत आक्रमक फटकेबाजी करण्यास सुरूवात केली. त्याने आपले अर्धशतकही पूर्ण केले. पण बॅरी मॅतकार्थीने ऋतुराजला 58 धावांवर बाद करून भारताला मोठा धक्का दिला. ऋतुराज बाद झाल्यानंतर स्लॉग ओव्हरमध्ये रिंकूनने तुफान फटकेबाजी केली. रिंकूने प्रथम ऋतुराज आणि नंतर शिवन दुबे यांच्या साथीने शेवटच्या दोन षटकांत 42 धावा करून भारताला 20 षटकांत 5 बाद 185 धावांपर्यंत मजल मारली. रिंकूने 21 चेंडूत 38 तर शिवम दुबेने 16 चेंडूत नाबाद 22 धावा केल्या.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube