Modi Pune Speech : पुणे जिल्ह्यात NDA चौकार मारणार: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ग्वाही
Modi Pune Speech : लोकसभा निवडणुकीमध्ये (Lok Sabha Election) राज्यात महायुतीला (Mahayuti) 48 जागांपैकी जास्त जागा मिळवून देण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी पुणेमध्ये महायुतीच्या उमेदवारांसाठी जाहीर सभा घेतली. या जाहीर सभेत पंतप्रधान मोदींनी मराठीत भाषणाला सुरुवात करत काँग्रेसवर (Congress) हल्लाबोल केला.
काँग्रेसवर हल्लाबोल करत मोदी म्हणाले, मनमोहन सरकारने (Manmohan Government) 10 वर्षात जितका विकासावर खर्च केला तितका खर्च आम्ही फक्त 1 वर्षात करतो. आज देश विकासाच्या मार्गावर असून स्टार्टअप इंडियात (Startup India) लोकांनी 10 वर्षात सव्वा लाखांपेक्षा जास्त स्टार्टअप बनवले आहे. त्यांच्या काळात भारत मोबाईलची आयात करायचा मात्र आमच्या काळात भारत मोबाईल निर्यात करतो. येत्या काही दिवसात पुणे ऑटोमोबाईल हब बनेल असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.
रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म हे मोदी सरकारचे मिशन असून त्याचा परिणाम आता दिसत आहे आणि तो दिवस दूर नाही जेव्हा तुम्ही बुलेट ट्रेनमधून प्रवास करणार. आता देशात 70 वर्षापेक्षा जास्त वयोगटातील लोकांना मोफत उपचार मिळणार ही मोदींची गॅरंटी आहे असं देखील मोदी म्हणाले. तर या लोकसभा निवडणुकीत एनडीए पुणे जिल्ह्यात चारही जागा जिंकून विजयचा चौकार मारणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पुढे मोदी म्हणाले, काँग्रेस सरकारने तुमच्याकडून महागाई आणि भ्रष्टाचारचा डबल टॅक्स घेतला. आम्ही सत्तेत आल्यानंतर महागाईवर नियंत्रण आणले आणि भ्रष्टाचारवर मोठी कारवाई केली.
शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका करत मोदींनी नाव न घेता काही भटकत्या आत्मा असतात. त्यांच्या इच्छा पूर्ण झाल्या नाही तर त्या आत्मा भटकत राहतात. महाराष्ट्र अशा एका भटकत्या आत्म्याचा शिकार झाला आहे अशी टीका त्यांनी शरद पवार यांच्यावर केली. भटकत्या आत्मा स्वतःचे काही नाही झाले तर दुसराचे बिघडविण्याची काम करतात. आमचा महाराष्ट्र अशाच भटकत्या आत्माचा शिकार झाला आहे.
तितका खर्च आम्ही फक्त 1 वर्षात करतो, मोदींचा पुण्यातून काँग्रेसवर हल्लाबोल
45 वर्षापूर्वीं येथील मोठ्या नेत्यांनी आपल्या महत्वाकाक्षांसाठी या खेळाची सुरुवात केली आहे. तेव्हापासून महाराष्ट्र अस्थिर झाला आहे. अनेक मुख्यमंत्री कार्यकाळ पूर्ण करू शकले नाही. हे विरोधकांना नाही तर ही आत्मा आपल्या पक्षात आणि कुटुंबातही असेच करत असल्याचा आरोप मोदींनी केला.