मोदी 400 पार’चा नारा देतात अन् टीका काँग्रेसवर करतात; पृथ्वीराज चव्हाणांचा पलटवार

मोदी 400 पार’चा नारा देतात अन् टीका काँग्रेसवर करतात; पृथ्वीराज चव्हाणांचा पलटवार

Prithviraj Chavan criticizes PM Modi : सध्या सुरू असलेल्या लोकसभेच्या रणसंग्रामात महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभांचा धडाका सुरू आहे. आज पंतप्रधानांनी सोलापूर, सातारा आणि पुणे अशा तीन सभा घेतल्या. (Satara Loksabha) यामध्ये त्यांनी सर्वत्र काँग्रेसवर जोरदा टीका केली. दरम्यान, वाईमध्ये साताऱ्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ सभा झाली. यामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केलेल्या टीकेला जोरदार उत्तर दिलं.

 

10 वर्षाचा हिशोब द्या

चव्हाण म्हणाले, आपल्या सभेतून पंतप्रधान मोदी 400 पार’चा नारा देतात आणि चर्चा मात्र काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर करतात अशा शब्दांत जोरदार पलटवार केला. तसंच, काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर टीका करण्यापेक्षा मोदींनी आपल्या 10 वर्षाचा आढावा सादर करावा असं आव्हानही दिलं. तसंच, मोदींच्या सभा आणि महाविकास आघाडीच्या सभा पाहिल्या तर अंदाज येतो विजय आमचाच आहे असंही यावेळी चव्हाण म्हणाले.

 

मोदींचा आत्मविश्वास ढळला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पूर्ण आत्मविश्वास ढळला आहे. त्यामुळे ते आपल्या कामाबद्दल बोलण्याऐवजी काँग्रेसवर टीका करतात असंही चव्हाण यावेळी म्हणाले. तसंच, आज भाजपला सभेसाठी माणसं येत नसल्याने पैसे देऊन माणसं गोळा करावी लागत आहेत असा थेट आरोपही चव्हाण यांनी यावेळी केला. त्याचबरोबर देशात तरुणांना नोकरी नाही. दुसरीकरडे देशाच्या अर्थव्यवस्थेचं मोदींनी वाटोळ केलं असा आरोपही चव्हाण यांनी केला.

 

अर्धी निवडणूक सोपी झाली

यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे म्हणाले, आजची सभा फार एतिहासिक आहे. मला उमेदवारी दिली त्याबद्दल मी आपले आभार मानतो. कारण मला समोर उमेदवार मिळाल्यामुळे माझी अर्धी निवडणूक सोपी झाली आहे. तसंच, वाईकर उद्याचा खासदार ठरवणार आहेत असा विश्वासही यावेळी शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube