तीनवेळा उमेदवारी दिली पण गद्दारी केली, पृथ्वीराज चव्हाणांची उदयनराजेंवर नाव न घेता टीका

तीनवेळा उमेदवारी दिली पण गद्दारी केली, पृथ्वीराज चव्हाणांची उदयनराजेंवर नाव न घेता टीका

Prithviraj Chavan : काही लोकांना ईडीची, सीबीआयची भीती दाखवली. खोक्यांचा घोडेबाजार केला आणि राज्यसभा दिली असा थेट आरोप करत पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजप-शिवसेनेवर जोरदार टीका केली. (Satara Loksabha) तसंच, चव्हाण यांनी यावेळी महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्यावरही जोरदार निशाना साधला. ते शशिकांत शिंदे यांच्या प्रचार सभेत बोलत होते. यावेळी शरद पवारही उपस्थित होते.

 

सांगली काँग्रेसनं का सोडली? पृथ्वीराज चव्हाण म्हणतात, तीन पक्षांच्या आघाडीत…

90 हजार मतांनी पराभव केला

आज जे विरोधी उमेदवार आहेत त्यांना आपण तीनवेळा संधी दिली. मात्र, निवडून आल्यानंतरही त्यांनी गद्दारी केली. पक्ष बदलला. परंतु, त्यानंतर झालेल्या निवडणुकीत श्रीनीवास पाटलांनी सुमारे 90 हजार मतांनी त्यांचा जोरदार पराभव केला असंही चव्हाण म्हणाले. तसंच, हे लक्षात ठेऊन आपण यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांना साथ द्या असं आवाहनही चव्हाण यांनी यावेळी केलं.

 

खोक्यांचं राजकारण केलं

यावेळी बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी अशोक चव्हाण यांच्यावरही नाव न घेता टीका केली. काही लोकांना ईडी, सीबीआयची भीती दाखवली. त्यानंतर पक्षात घेऊन काहींना राज्यसभा दिली असं म्हणत चव्हाण यांनी अप्रत्यक्ष अशोक चव्हाण यांना लक्ष केलं. तसंच, या लोकांनी खोक्यांचं राजकारण केलं असंही ते म्हणाले.

 

Lok Sabha Election: माढा, सातारा, सोलापूरमध्ये पंतप्रधानांच्या सभांचा धडाका ! पुण्यात मुक्काम

फोडाफोडीला यांनी जास्त लक्ष दिलं

शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आपल्याला शाबूद ठेवायचा असेल तर यावेळी डोळे उघडे ठेऊन मतदान करावं लागेल. तसंच, डोंगर दऱ्यातील कडी कपारीचे लोकं गद्दार नाहीत. यावेळी ते भाजप-शिवसेनेला चांगला धडा शिकवतील असंही चव्हाण यावेळी म्हणाले आहेत. तसंच, जनतेच्या प्रश्नापेक्षा नेत्यांच्या फोडाफोडीला यांनी जास्त लक्ष दिलं असंही चव्हाय यावेळी म्हणाले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube